adhar card esakal
पिंपरी-चिंचवड

Adhar Card : शाळांकडून सक्ती, विद्यार्थी वेठीस; आधारकार्डच्या अपडेटसाठी धावाधाव

आधारकार्ड अद्ययावत नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत अलिखित फतवा काढून पालकांसह विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.

गणेश बोरुडे

आधारकार्ड अद्ययावत नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत अलिखित फतवा काढून पालकांसह विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.

तळेगाव स्टेशन - आधारकार्ड अद्ययावत नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत अलिखित फतवा काढून पालकांसह विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. शिक्षण विभागासह, विद्यार्थ्यांना आधार अपडेटबाबत वेळोवेळी सूचना न देता अचानक सक्ती करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांविरोधात पालकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

मावळच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व केंद्रप्रमुखांना १४ एप्रिलला शासकीय सुटीच्या दिवशी कागदावर हस्तलिखित आदेश पाठवून एका दिवसांत १५ एप्रिलला सायंकाळी पाचपर्यंत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधारबाबत अपडेट घ्यायला सांगितले. सुटीच्या दिवशी अचानक आलेल्या या फतव्यामुळे पालकांची एकच धांदल उडाली. सलग तीन दिवस सुट्यांमुळे सार्वजनिक आधार नोंदणी केंद्र बंद. आता करायचे काय, हा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला.

शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना दिल्यानुसार शाळांनी मुदतीपूर्वीच विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करणे अपेक्षित होते. तशा सूचना पालकांसह विद्यार्थ्यांना वेळोवेळी देणे गरजेचे होते. मात्र, बऱ्याच शाळा याबाबत ढिम्म राहिल्या. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळांतील आधार अपडेट नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ठराविक शैक्षणिक संस्था सोडल्या तर बहुतांश खासगी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटबाबत तसदी घेतलेली दिसत नाही. त्यामुळेच अशा काही शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना आता ऐनवेळी त्रास सहन करावा लागत आहे.

केंद्रांची संख्या वाढवावी

आधार अपडेट नसलेल्या विद्यार्थ्यांची बाराशेहून अधिक संख्या आणि दिवसाकाठी शक्य आधार अपडेटची संख्या लक्षात घेता मावळातील सर्व आधार केंद्रे विद्यार्थ्यांसाठी किमान आठवडाभर राखीव ठेवली तरी, उद्दिष्ट पूर्ण होणे शक्य वाटत नाही. अशा परिस्थितीत शाळेकडून अचानक आधार अपडेट सक्ती केल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या या धोरणाविरोधात पालकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मावळच्या तहसीलदारांनी तळेगावसह इतर भागातील आधार नोंदणी केंद्रांची संख्या त्वरित वाढवावी. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटला किमान दोन आठवडे मुदतवाढ देण्याची मागणी आहे.

आधार अपडेट नसलेल्या मावळातील विद्यार्थ्यांची संख्या (१५ एप्रिल२०२३ पर्यंत)

  • ७८ - तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळ

  • ११० - जिल्हा परिषद शाळा

  • १,०१९ - खासगी शाळा

  • १,२०७ - आधार अपडेट नसलेले एकूण विद्यार्थी

आधार केंद्रावरील अडथळे

  • मोजक्याच आधार केंद्रावरची तोबा गर्दी, नेटवर्कमधील अडथळे, सर्व्हर डाउनची डोकेदुखीमुळे एक केंद्रावर दिवसभरात जेमतेम १५-२० आधारकार्ड अपलोड अथवा अद्ययावत

  • लाखभरावर लोकसंख्या पोचलेल्या तळेगावसारख्या नागरी भागात सर्वश्रुत असे नगर परिषदेतील केवळ एकच आधार केंद्र नियमित चालू असते

  • एकच काउंटर असल्याने तिथेही दिवसभर मोठी रांग

  • बीएसएनएलमध्ये सुरू झालेले आधार केंद्र काही दिवसांपासून बंद

  • तळेगाव नगर परिषदेतील उघड्यावरील आधार नोंदणी केंद्रात दिवसभर ताटकळत उभे राहून, वारंवार फेऱ्या मारूनही आधार अपडेट होत नाही.

स्टुडंट पोर्टल आणि यू आयडी पोर्टल लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याबाबत खासगी, शासकीय शाळांना वारंवार सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र, काही शाळांनी या बाबत गांभीर्यपूर्वक न घेता, पालकांना वेळोवेळी न कळविल्याने आता पालकांना ऐनवेळी पळापळ करावी लागत आहे.

- मयूरेश मुळे, लिपिक, तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळ

एका दिवसात फक्त दहा-पंधरा आधारकार्ड अपडेट होतात. बरेच पालक फेऱ्या मारून परत येतात. केंद्रांची कमतरता तसेच सर्व केंद्रावर नवीन कार्ड काढण्याचा सोय नाही. हे सर्व पाहता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा आणि पालकांना वेठीस धरणे बंद करावे. शाळांना स्वतंत्र आधार कँप लावून द्यावा. तोपर्यंत शाळांना मुदतवाढ द्यावी.

- उपेंद्र खोल्लम, पालक, तळेगाव दाभाडे

मावळातील अस्तित्वातील आधार केंद्रे आणि पंचायत समितीची दोन मशिन अशा जवळपास दहा ठिकाणी आधार अपडेटची सोय केलेली आहे. यूआयडी पोर्टलवर अपडेट लिंक न झाल्यास विद्यार्थी शासकीय लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून आधार अपडेट गरजेचे आहे. मात्र आधार केंद्रांची संख्या पाहता मुदतवाढ देता येऊ शकेल.

- सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी मावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT