School Fee Sakal
पिंपरी-चिंचवड

शुल्क वसुल होण्यासाठी शाळा लढवतात नवनवीन शक्कल

सरकारने खासगी शाळांना १५ टक्के शुल्क कपात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शाळांकडून अद्याप अंमलबजावणी केलेली नाही.

आशा साळवी

पिंपरी - सरकारने खासगी शाळांना १५ टक्के शुल्क कपात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शाळांकडून अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. याउलट तिमाही, सहामाही, आठमाही आणि वार्षिक परीक्षांसाठी शाळांनी नवीन अ‍ॅप तयार केले आहेत. या अ‍ॅपमधून शुल्काची परिपूर्ती न केलेल्या विद्यार्थ्यांना वगळून ज्यांनी शुल्क भरले आहे, अशांनाच परीक्षेला बसू देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत.

सध्या कोरोनामुळे शाळाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, आता सरकारनेच १५ टक्के शुल्क कपात करण्यास सांगितल्यामुळे कारवाई होवू नये आणि शुल्कदेखील वसुल होण्यासाठी शाळा नवनवीन शक्कल लढवीत आहेत. गेल्या वर्षापासून शुल्क न भरल्यामुळे शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद करणे, लॉगिन आयडी ब्लॉक करणे, निकाल न देणे या गोष्टी करून पाहिल्या आहेत. आता शुल्क न भरल्यामुळे परीक्षांपासून वंचित ठेवण्यासाठी काही शाळांनी परीक्षा घेण्यासाठी नवीन अ‍ॅप विकसित केले आहे. त्या अ‍ॅप व पोर्टल मधून परीक्षेसंदर्भातील सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना मिळतात. पण ज्यांनी पूर्ण शुल्क भरले नाही, त्यांच्यासाठी ते अ‍ॅप व पोर्टल बंद ठेवण्यात आले आहे. जर विद्यार्थी परीक्षेलाच बसले नाही तर त्याचा काय उपयोग. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका आहे, अशी खंत पालक व्यक्त करत आहेत.

पालक शरद उनवणे म्हणाले, ‘‘फी स्ट्रक्चर मध्ये शाळांनी शैक्षणिक शुल्क सरसकट ७५ हजार लावले आहे. यापूर्वी शैक्षणिक शुल्क ४० हजार, कॉम्प्युटर क्लास फी १० हजार आणि इतर फी मिळून ७५ हजार असे फी स्ट्रक्चर होते. यावर्षी फक्त शैक्षणिक शुल्कच ७५ ते ८० हजार लावले आहे हे चुकीचे आहे. शाळांनी परिक्षेचे वेगळे पोर्टल काढले आहे. ज्यामध्ये परीक्षेसंदर्भात सर्व अभ्यासक्रम असेल आणि ती फी न भरलेल्या पालकांच्या मुलांसाठी बंद ठेवली आहे, हे अन्यायकारक आहे.’’

‘पालकांकडून शुल्क वसुल करण्यासाठी शाळांची मनमानी सुरु आहे. आयडी ब्लॉक करणे, पालकांना धमकावणे हे सर्व शाळांचे उद्योग सुरु आहेत. त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. सरकारकडून काढण्यात येणारे अध्यादेश आव्हानात्मक नाहीत. त्यातून पालकांना दिलासा बिलकूल मिळत नाही.’

- जयश्री देशपांडे, संस्थापक, पॅरेन्टस असोसिएशन

‘ज्या शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्या पालकांनी शाळांच्या नावासह आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही त्या शाळांवर कारवाई करू.’

- औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT