pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : सोमवारी शहरात भरणार शाळा

आयुक्तांचे आदेश : विद्यार्थ्याला शाळेत हजर राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्या आता चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्याआधारे शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग भरण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर सर्व माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनासह महापालिकेचीही लगबग सुरू झाली आहे.

शहरात एकूण ३ लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४९ हजार ९२४ आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था शाळांना करावी लागेल. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरिता विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले आहे. दरम्यान १००टक्के शिक्षकांची उपस्थिती असून सर्वच शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी आणि कोविड लसीकरण होणे अनिवार्य असल्याचे आदेशात म्हटले आहे.

‘‘राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच शहरातील शाळा सुरू करण्यात येतील. शाळेच्या गेटवर टेंपरेचर गण, सॅनिटायझर आदी गरजेच्या वस्तू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार नाहीत.’’

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त महापालिका

‘‘ पूर्ण राज्यात सरसकट शाळा सुरू होणे आणि मूल्यमापनाच्या मार्गदर्शक सूचना मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.’’

-महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT