पिंपरी-चिंचवड

स्काऊट मास्तर व गाइड कॅप्टन प्रशिक्षण शिबिराची सांगता

CD

भोसरी, ता. ७ ः महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्था, पुणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाइड, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रियदर्शिनी ग्रुप ऑफ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट मास्तर व गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची सांगता भोसरीत झाली. सात दिवसाच्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ३९ गाइड कॅप्टन व ५५ स्काऊट मास्टर यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी या प्रशिक्षणार्थीना स्काऊट चळवळीचा इतिहास, नियम, वचन, ध्येय, नियम, दोरीच्या गाठी, प्रथमोपचार याच्यासह स्काऊट शिक्षणातील अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिरात गेस्ट लेक्चरर म्हणून प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रायगड, सी-स्काऊट प्रमुख डॉ. गोपी शेट्टी, मनोज पवार, बिपिन देशमुख, अब्दुल नबी आदींनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिल्पी शुक्ला, करुणा विश्वकर्मा, फरजना शेख, अरुण पेशकार, शिबिर संचालक अंजोलीना भाकरे, सहायक दिगंबर करंडे, रफेल जॉन समी, दिलीप नेवसे, चंद्रभान पोखरकर, आनंद सोमवंशी, अपेक्षीता घारगे, शमा शिकलगार, विधा पेन्सलवार आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT