sayaji-shinde 
पिंपरी-चिंचवड

शेतकरी वाचला तरच, देश वाचेल - सयाजी शिंदे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ""देशातील शेतकरी वाचला तरच, देश वाचेल,'' असे मत ज्येष्ठ अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. भोसरी एमआयडीसीतील वनौषधी उद्यानातील झाडे वाचवली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

वृक्ष संवर्धन व संगोपनासाठी एमआयडीसीने भोसरीतील एक एकरचा भूखंड महापालिकेला दिला होता. महापालिकेने तो डॉक्‍टरांच्या निमा संस्थेला 21 वर्षांच्या कराराने वनौषधी वृक्ष लावण्यासाठी दिला होता. त्यानुसार निमाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे सुमारे साडेचारशे दुर्मिळ औषधी वनस्पती व झाडे लावली आहेत. हा भूखंड एमआयडीसीने विकला असून, संबंधित व्यक्तीने झाडे काढून टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यास निमाने विरोध केला असून, वनौषधी उद्यान वाचवावे, असे साकडे एमआयडीसी व महापालिकेला घातले आहे. त्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी व महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी शिंदे बुधवारी महापालिका भवनात आले होते. त्या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""दुर्मिळ झाडांना निमाने लहान मुलांप्रमाणे जोपासले आहेत. 138 प्रकारची झाडे त्यांनी जगवली आहेत. सर्व झाडे आयुर्वेदिक आहेत. ती आपण वाचवली पाहिजे.'' 

पंजाब, हरियाणा व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिंदे म्हणाले, ""ज्या देशातील शेतकरी पुढे गेला, तो देश पुढे जातो. शेतकरी मागे गेल्यास देशही मागे जातो. सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे देश मागे चालला आहे. तो पुढे जाण्यासाठी शेतकरी पुढे गेला पाहिजे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.'' 

Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये 139 नवीन रुग्ण; 210 जणांना डिस्चार्ज मिळाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT