पिंपरी-चिंचवड

Video : सेंसरयुक्त सॅनिटायझर यंत्र विकसित, कशी केली निर्मिती वाचा

सागर शिंगटे

पिंपरी : पूर्णपणे भारतीय बनावटीच्या वस्तूंपासून सेंसरयुक्त सॅनिटायझर यंत्राची पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्राने निर्मिती केली आहे. अवघ्या दहा दिवसांत हे यंत्र विकसित करण्यात आले असून, त्यामधून द्रव आणि जेल अशा दोन्ही प्रकारे सॅनिटायझर घेता येणार आहे. त्याची आणखी निर्मिती करून मागणीनुसार कमीत कमी किंमतीत विक्री करण्याचा देखील केंद्राचा विचार आहे. 

चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रामध्ये ऑटोमोबाईल, उर्जा, मजेशीर विज्ञान (फन सायन्स) अशी विविध दालने आहेत. त्यामधून निरनिराळ्या शास्त्रीय प्रयोगांवर आधारित सुमारे 300 प्रकारची वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थी, अभ्यासक आणि विज्ञान प्रेमी नागरिकांसाठी पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. याच केंद्राच्या प्रदर्शन विकास कक्षातर्फे सेंसरयुक्त सॅनिटायझर यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. कक्षाचे तांत्रिक सहाय्यक दत्ता लोणकर आणि इलेक्‍ट्रॉनिक टेक्‍निशियन कुणाल जयसवाल यांनी त्याची निर्मिती केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणकर म्हणाले, "टाळेबंदीमुळे दैनंदिन काम सोडून वेगळा विचार करण्यास आम्हाला वेळ मिळाला. शाळा-महाविद्यालये लवकर सुरू होणार नसल्याने केंद्राच्या उत्पन्नवाढीसाठी इतर मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही एप्रिल महिन्यात सेंसर सॅनिटायझर यंत्र बनविण्यासाठी सुरुवात केली. मात्र, टाळेबंदीमुळे त्याचे साहित्य मिळविण्यात प्रारंभी अडचणी आल्या. मात्र, आता द्रव आणि जेल अशा दोन्ही प्रकारचे सॅनिटायझर आमच्या यंत्रामुळे वापरता येऊ शकतील. या यंत्रात द्रव सॅनिटायझरची 5 लिटर, तर जेलची 1 लिटरपर्यंत साठवण क्षमता आहे. हे यंत्र 10 ते 12 व्होल्ट बॅटरी किंवा वीजेवरही चालू शकते. या यंत्रासाठी 2 इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईस, पंप, सॅनिटायझर वाया जाऊ नये, यासाठी सोलोनाईड वॉल आदी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सध्या बाजारपेठेत सेंसर सॅनिटायझर 8 हजार रुपये आणि त्यापुढील किंमतीत उपलब्ध आहे. तसेच ते एकाच प्रकार मिळते. मात्र, विज्ञान केंद्राच्या यंत्रात दोन्ही प्रकार केवळ निम्म्यापेक्षा किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार त्याची क्षमताही वाढविता येऊ शकणार आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी केंद्राचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन सावळे, प्रशासकीय अधिकारी अस्मिता सावंत आदींचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन लाभले. 

प्लॅस्टिकपासूनही शक्‍य...

सध्या यंत्रासाठी ऍक्रिलिक शीट, फोमशीटचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रासाठी सुमारे साडेचार हजार रुपये इतका खर्च आला आहे. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार आणि राज्य सरकारच्या नियमांना अधीन राहून प्लॅस्टिकपासून यंत्राचीही निर्मिती करता येऊ शकते. 

"पूर्णपणे भारतीय बनावटीच्या सेंसर सॅनिटाझर यंत्राची निर्मिती करण्यावर आमचा भर होता. त्यानुसार आम्ही हे यंत्र विकसित केले आहे. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून मागणी झाल्यास कमीत कमी किंमतीत हे यंत्र उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.''
- प्रवीण तुपे, संस्थापक-संचालक, पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT