पिंपरी-चिंचवड

आनंदाची बातमी : सात बालकांनी केली...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचार घेणाऱ्या सात बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागातील डॉक्टरांच्या पथकाला यश आले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील दोन ते १२ वर्षे वयोगटातील सात बालकांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी (ता. २) वायसीएम रुग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले. १६ व १७ एप्रिल रोजी ही सात कोरोनाग्रस्त बालके बालरोग विभागात दाखल झाली होती. त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील पाच व भोसरीतील दोन बालकांचा समावेश होता. त्यांना  वेळोवेळी सर्व उपचार देवून १४ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. दोन बालकांवर कोरोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण ३० हजार व ६६ हजार झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानुसार कळले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण दीड लाखांवर असते. त्यासाठी या बालकांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले. त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते. माता व बालकांच्या १४ दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगीरी करता आली. बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सूर्यकांत मुंडलोड यांच्यासह सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफ नर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाला, त्यांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT