pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

एसटीचे दररोजचे सात लाखाचे नुकसान

एसटी जागेवरच उभ्या असल्याने वाहनांच्या बॅटऱ्या झाल्या डाउन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर एसटी आगार प्रशासनाचे दररोजचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांत एक कोटींहून अधिक नुकसान आगाराचे झाले आहे. परिणामी, आगारातील एसटी जागेवरच ठप्प राहिल्याने वाहनांच्या बॅटऱ्या डाउन झाल्याचे चित्र समोर आले आहे.
वल्लभनगर आगारातील ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तरीही कर्मचारी मागे हटलेले नाहीत. त्यात कार्तिकी एकादशी पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या देखील ठप्प राहिल्या. अधिक प्रमाणात नुकसान झाले.

दिवाळीहून परतीच्या प्रवासावेळीच एसटीचा संप झाल्याने अनेकजण गावीच अडकून राहिले. शिवाय दिवाळी व पर्यटनातून मिळणारा नफ्यालाही मार बसला. कोकण दर्शन आणि महाबळेश्वर या ठिकाणी सुरू झालेल्या गाड्यांमुळे आगाराला चांगले उत्पन्न मिळू लागले होते. परंतु, दोन फेऱ्यानंतर लालपरीची चाके जाग्यावरच थांबली. त्यानंतर आठ तारखेला संपच सुरू झाला. तो अद्यापपर्यंत सुरू आहे. मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच राहणार असल्याने एसटी आणखी तोट्यात जाणार असल्याची चिन्हे आहेत.

दिवसभर आगारात ६५ च्यावर एसटी जागेवरच उभ्या असल्याने या सर्व वाहनांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. बऱ्याच वाहनांच्या बॅटरी डाउन झाल्या आहेत. ब्रेक सिस्टीम, इंजिन व ऑईलची तपासणी करावी लागणार आहे. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी असे मिळून या एसटी देखभाल दुरुस्तीचे कामकाज पाहत आहेत. परंतु, सर्व वाहनांची कर्मचाऱ्यांअभावी देखभाल करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे, एसटी प्रशासनाची डोकेदुखी संप मिटल्यानंतर आणखी वाढणार आहे.

‘‘दररोज आगारात एसटी जागेवरच ठप्प आहेत. देखभाल दुरुस्तीचा काही अंशी त्रास होणार आहे. मात्र, आगाराचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान होत आहे.’’

- गोविंद जाधव,

स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT