पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : महापालिका शिक्षकांना अखेर सातवा वेतन आयोग लागू 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या वर्षापासून प्रलंबित सातवा वेतन आयोग अखेर महापालिका प्राथमिक  शिक्षकांना लागू झाला. या सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या आदेशावर मंगळवारी (ता.14) आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारचा निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये होऊनही काही त्रृटींमुळे शिक्षकांना वेतन आयोगाचा लाभ मिळत नव्हता. 2 फेब्रुवारी 2020 रोजी  प्राथमिक शिक्षकांना आयोग लागू करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा महापालिकास्तरावर विलंब होत गेला. अखेर शासन निर्णयातील त्रुटीची दुरुस्ती वा शुद्धीपत्रक शासनाकडून सद्य:स्थितीत होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने आज पदवीधर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यात सध्या कार्यरत व सेवानिवृत्त साधारणतः दीड हजार शिक्षकांच्या वेतनश्रेण्या पडताळणी करून आयोग लागू करण्याचा निर्णय होऊन आदेशावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली. महापालिका कर्मचाऱ्यांना जूनचे वेतन आयोगाप्रमाणे मिळाले आहे.

यासाठी महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही पाठपुरावा केला होता. दरम्यान, कोरोना संशयितांच्या सर्वेक्षणाचे कामही शिक्षक करीत आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना आनंद झाला. कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय अतिशय उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.

या संघटनांनी केला पाठपुरावा

पदवीधर शिक्षक संघटना, शिक्षक संघ, शिक्षक परिषद, अनु.जाती जमाती संघटना आदींनी पाठपुरावा केला.

वेतन आयोग लागू करण्यासाठी कर्मचारी महासंघाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. गेल्या महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांना लागू झालेला आहे. त्यापाठोपाठ शिक्षकांना आयोग लागू केल्यामुळे महापालिका शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT