Food Poisoning sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : डी. वाय. पाटील स्कूल शाळेमध्‍ये अन्न पदार्थातून विद्यार्थ्यांना विषबाधा

शाहूनगर येथील डी. वाय. पाटील स्कूल शाळेमध्‍ये अन्न पदार्थातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) घडली. विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शाहूनगर येथील डी. वाय. पाटील स्कूल शाळेमध्‍ये अन्न पदार्थातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) घडली. विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली.

डी. वाय. पाटील स्कूलमध्ये नवरात्रीनिमित्त फुड फेस्टिवलचे आयोजन केले होते. इयत्ता पाचवी आणि नववीतील विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. सकाळी नऊ वाजता ब्रेड आणि चटणी खाल्ल्यानंतर २० व २६ विद्यार्थ्यांना उलट्या सुरु झाल्या. काहींच्या पोटात दुखू लागले.

विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ सारखं वाटून भोवळ येऊ लागल आहे. एकावेळी येवढ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यामुळे शाळा प्रशासनाने खासगी रुग्णालयात संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलावून घेतली. एकूण २६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना सकाळी माहिती दिली. माहिती मिळताच, विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची अवस्था पाहुनही पालकही बेभान झाले होते, याच निकृष्ट दर्जाच्या सँडविच मधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी त्या विद्यार्थ्यांना तपासले असता, त्यांना सँडविच मधून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने शाळेकडे चौकशी केली. हे सर्व विद्यार्थी १० ते १४ वयोगटातील असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

‘शाळेत आज फुडफेस्टिवलमध्ये सकाळी विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. याच ब्रेड आणि चटणीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकिय खर्च संस्था प्रशासन करणार आहे. विषबाधा झाल्यामुळे डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’

- अभय कोतकर, अध्यक्ष डी. वाय. पाटील स्कूल शाहूनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT