पिंपरी-चिंचवड

मावळातील प्रलंबित विकासकामांना मिळणार गती; शरद पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मावळातील वर्षांनुवर्षे प्रलंबित समस्या आणि विकासकामांच्या सद्य:स्थितीबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून आढावा घेत प्रलंबित कामांना गती देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, महारेल तसेच, संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देहूरोड ते लोणावळादरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल तसेच, सेवारस्त्यांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. या कामांना अद्यापही गती मिळालेली नाही. कान्हे, मळवली रेल्वे उड्डाणपूल, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग, केंद्र सरकार आणि संरक्षण खात्याशी संबंधित मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, अशा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य सूचना पवार यांनी दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदर संयुक्त बैठकीमुळे रखडलेल्या अनेक कामांना गती मिळणार असून, मावळ तालुक्याच्या विकासाला नव्याने ऊर्जा आणि गती देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मत बैठकीत उपस्थित मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. तळेगावचे नगरसेवक बापूसाहेब भेगडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, संतोष पाटील, सा.बां. विभगाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, चंद्रकांत नाईक, रा.म.प्रा. उपव्यवस्थापक अनिल गोराड यांच्यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापारी कराराविरोधात बीडमध्ये मोर्चा; देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT