shiv jayanti 2023 Tempo accident Shiva Jyot 33 injured Drunken driver traffic jam
shiv jayanti 2023 Tempo accident Shiva Jyot 33 injured Drunken driver traffic jam sakal
पिंपरी-चिंचवड

Shiv Jayanti 2023 : शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात; ३३ जखमी

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी : शिवजयंतीनिमित्त मल्हारगडहून (ता. पुरंदर) मावळ तालुक्यातील शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन जाणा-या शिवभक्तांच्या टेम्पोला कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे येथे हॉटेल साई दरबार समोर अपघात झाला.

ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ३३ शिवभक्त जखमी झाले असून शुक्रवारी (ता. १०) पहाटे साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र ट्रकचालकाला तात्काळ अटक करावी म्हणून शिवभक्तांनी महामार्ग रोखून धरल्याने आठ वाजेपर्यंत महामार्गावर मेगा ब्लॉक झाला होता.

याबाबत टेम्पो चालक सागर भागू कोंडभर (वय. ३४, रा. शिलाटने, कार्ला, मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रकचालक नामदेव विनायक पाटोळे (वय. ३६) व क्लिनर प्रशांत विकास बनसोडे (वय. २६, दोघेही राहणार उमरगा, जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून ट्रक व क्लिनर बनसोडे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर सोमटनेतील पवना, पायोनीयर व रावेत येथील ओजस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी, मल्हार गडाहून शिवज्योत नेणारे काही तरुण टेम्पोत होते तर काहिजन टेम्पोच्या मागे, पुढे व काहीजण दूचाकीवर लोणावळयाच्या दिशेने जात असताना ताथवडे येथे एमएच ४८, बीएम ११९२ क्रमांकाच्या ट्रकने मागून टेम्पोला जोरदार धडक दिली यात टेम्पोतील तरुण जखमी झाले तर धडकेत टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील पायी व दुचाकीवरील शिवभक्तांना टेम्पोची धडक बसली.

अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकचालकाला तात्काळ अटक करावी व जखमींवर उपचार करून त्यांना भरपाई द्यावी या मागणीसाठी शिव भक्तांनी मुंबई-बंगळूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे रावेत ते बालेवाडीपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अखेर पोलिसांनी शिवभक्तांची समजूत काढत जखनींना रुग्णालयात रुग्णालयात हलविले शिवभक्तांना रस्त्यावरून बाजूला घेतल्याने आठच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. दहाच्या सुमारास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त मनोजकुमार लोहिया, उपायुक्त काकासाहेब डोळे यांनीही भेट देऊन पाहणी केली.या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी व नोकरदार, कामगारांना बसला परीक्षां सुरू असल्याने विद्यार्थ्यांना तर बस मधून उतरत पायी शाळा गाठावी लागली.

शिलाटने पंचक्रोशीत नियोजित कार्यक्रम रद्द

शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांना नियतीने रस्त्यातच रोखले. मोठ्या उत्साहात शिवजयंती साजऱ्या करणाऱ्या शिलाटने ग्रामस्थांच्या आनंदावर या अपघाताने विरजन पडले. सर्व गाव चिंतातुर झाले असून शिलाटनेगावासह आजू-बाजूच्या पंचक्रोशित

शिव जयंतीनिमित्त मिरवणुका, मर्दानी खेळ, पोवाडे, सांस्कृतिक व सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मात्र पहाटेच अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनीच केवळ शिव प्रतिमेचे पूजन करून नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे शिलाटनेचे माजी सरपंच हेमंत भानुसघरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

हे शिवभक्त झालेत जखमी

दक्ष भानुसघरे, ऋतिक कोंडभर, संस्कार कोंडभर, गणेश कोंडभर, वेदांत कोंडभर, अथर्व कोंडभर, यश कोंडभर, अभिषेक मोरे, सिध्दार्थ भानुसघरे, रोहन भानुसघरे, विरेन मोरे, सिद्धेश कोंडभर, साहिल पाटफोडे, करण कोंडभर, आदित्य सातकर, हर्ष धाम, गौरव भानुसघरे, तेजस कोंडभर, सौरभ कोंढभर यासह अन्य तेराजण जखमी झाले असून यापैकी आर्यन सोमनाथ कोंडभर व विलास पोपट कोंडभर हे अधिक जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT