शिवप्रसाद महाले  sakal
पिंपरी-चिंचवड

शिवप्रसाद महाले यांच्या “रिचार्ज टू डिस्चार्ज” उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन मध्ये नोंद

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्तेही सन्मान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना आजारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवणे अत्यंत गरजेचे होते. नाशिक येथील शिवप्रसाद महाले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पीटल, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल व मनपाच्या इतर रुग्णालयात “ रिचार्ज टू डिस्चार्ज ” हा उपक्रम राबवत आहेत. सुरु करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. याबद्दल मिळालेले सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट ॲवार्ड केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते महाले यांना प्रदान करण्यात आले. अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

महापौर ढोरे म्हणाल्या, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे मनाधैर्य वाढविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, त्यांच्या आवडीची गाणी वाजवून त्यांचेकडून म्युजिकल एक्सरसाईज करुन घेणे, मेडिटेशन करुन घेणे व मोटीवेशन सेशन घेतले. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये कमालीचा सकारात्मक बदल दिसुन आला. तसेच रुग्णांमध्ये कोरोना विरुध्द लढण्यासाठी अधिकचे बळ प्राप्त झाले. असा दाखला स्वत: कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी देखिल त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक बदलाविषयी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भारतातील पहिली महापालिका ठरली. याअगोदर प्रथम मालेगाव येथे पोलिस प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणेत आला होता. या स्तुत्य अशा उपक्रमाची दखल केंद्रीय पातळीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारतीताई पवार यांनीही घेतली. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच महाले यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT