पिंपरी-चिंचवड

चिंचवड : क्रांतिवीर चापेकर संग्रहालयाच्या आठवणीसाठी नगरसेविकेची 'गांधीगिरी' 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड येथे अडीच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेले 'क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय' अद्याप उभारलेले नाही. याची आठवण करून देण्यासाठी शिवसेना नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे व जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी क्रांतिवीर चापेकर स्मृतिचिन्ह देवून आयुक्तांचा सत्कार केला. 

"क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिसऱ्या टप्प्याचे काम करणे' हे लेखाशिर्ष निर्माण करून चापेकर चौकातील समूहशिल्पाचे काम संपल्यानंतर पुढील वर्षी क्रांतिवीर चापेकरवाडा परिसराचे काम करायचे; असे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता एम. टी. कांबळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत ठरले होते. त्यानंतरच्या कालावधीत श्रावण हर्डीकर यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे या कामाला गती येईल, अशी आशा निर्माण झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रीय संग्रहालयासाठी बारा कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय प्रशासकीय मान्यता देखील मिळाली. नंतर मागील अडीच वर्षांच्या काळात पालिकेने केवळ 48 लाख 98 हजार रुपयांची निविदा काढून प्रारंभाचा कार्यक्रम आटोपला. भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 23 जुलै 2018 रोजी झाले. मात्र, नंतर प्रशासनाला कामाचा विसर पडला. बांधकाम परवानगी, वाहनतळ समस्या, अंदाजपत्रक, निविदा कोणी काढायची, कशी काढायची या बाबत अजूनही कागदोपत्री निश्‍चित अंतिम धोरण ठरले नसल्याचे सांगतात. संभाव्य अडचणी लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी, स्मारक समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांची प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन कामातील प्रगतीचा आढावा घेणे आवश्‍यक होते. परंतु अक्षम्य असे दुर्लक्ष केले. त्याचाच परिपाक म्हणून काम अजूनही कागदावरच आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराची अस्मिता, श्रद्धास्थान असणारे क्रांतिवीर चापेकर यांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन खुद्द मुख्यमंत्री करतात. त्याच कामाची दोन वर्षानंतर प्रगती शून्यच राहते. हे नियोजनशून्य प्रशासकीय कारभाराचे लक्षण आहे. कामाला गती न दिल्यास शहरात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करणार असल्याचेही चिंचवडे यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT