Shivputra Sambhaji Mahanatya sakal
पिंपरी-चिंचवड

Shivputra Sambhaji Mahanatya : भोसरीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा थरार

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतची शौर्यगाथा... भव्य रायगड किल्ल्याची प्रतिकृती... घोडदळ आणि पायदळ सैनिकांची रणधुमाळी...

सकाळ वृत्तसेवा

भोसरी - स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतची शौर्यगाथा... भव्य रायगड किल्ल्याची प्रतिकृती... घोडदळ आणि पायदळ सैनिकांची रणधुमाळी... 'छत्रपती संभाजी महाराज की जय'चा जयघोष...आणि फटाक्यांची आतषबाजी... अशा वातावरणात शिवपुत्र संभाजी या महानाट्यातून भोसरीत श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महानाट्याच्या शुभारंभाच्या प्रयोगाला माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवाध्यक्ष इमरान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, सारिका हरगुडे, अॅड. राहुल गवळी, भरत लांडगे, काशिनाथ जगताप, सुरेश म्हेत्रे, सचिन सानप, सागर तापकीर, स्वप्नील गायकवाड, शोभा साठे, अश्विनी गवळी आदींच्या हस्ते शस्त्रपूजन, अश्वपूजन, देवीची आरती आणि रंगमंच पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याद्वारे 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य भोसरीतील गाव जत्रा मैदानात 22 ते 25 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी सहा वाजता श्रोत्यांसाठी विनामूल्य आयोजित केले आहे. शुभारंभाच्या प्रयोगाला गाव जत्रा मैदान हाउसफुल झाले होते.

महानाट्यातील छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अण्णाजी पंत यांना दिलेली देह दंडाची शिक्षा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पुत्र व छत्रपती संभाजी महाराज यांची भेट, किल्ले जंजिरावरील चढाई, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आदी प्रसंगाला श्रोत्यांची दाद मिळाली.

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका बजावत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी श्रोत्यांमधून घोड्यावरून मारलेली रपेट चित्त थरारक होती. नागरिक उभे राहून छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत साथ देत होती.

महानाट्यानंतर श्रोत्यांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

निवडणुकीची रणधुमाळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी या अगोदरच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महानाट्याच्या सुरुवातीला आणि मध्यंतराला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाची चित्रफीत दाखवण्यात येत होती.

त्यामुळे या महानाट्याद्वारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT