शिवसेनेचे राऊत
शिवसेनेचे राऊत 
पिंपरी-चिंचवड

"आलात तर तुमच्या सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय"

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होईल की नाही, याचा विचार करू नका. आघाडीसाठी आम्ही सन्मानाने एकत्र बसू. पण, स्वाभिमान सोडून तडजोड करणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही आलात तर तुमच्या शिवाय स्वबळावर सर्व जागांवर लढू,’’ असा सूचक इशारा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात शिरूर लोकसभा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. २६) भोसरीत झाला. त्यात राऊत बोलत होते. पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ‘‘पालकमंत्री आमचं ऐकत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. राज्यात सरकार आपले आहे. मुख्यमंत्री आपले आहेत. या भागात पालकमंत्र्यांचा दरारा आहे. पण, त्यांनी आमचंही ऐकलं पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना नाराज करू नका. नाही ऐकलं तर गडबड होईल. ऐकलं तर बरं होईल. नाही तर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले आहेत. दिल्लीचा अंदाज घ्यायला. कारण, उद्या आम्हाला दिल्लीतही राज्य करायचे आहे,’’ असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. ते पुण्यात आले आणि घासून का होईना पण, आमदार झाले. आम्हीही पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घासून नाही, पण ठासून निवडून येऊ. महापौर देखील आमचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांच्या जन्मभूमीत भगवा नसल्याची खंत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातील. ते अनेकदा पुण्यात आले. शेजारी पिंपरी-चिंचवड आहे. अनेक कार्यक्रम त्यांनी या शहरांत घेतले. पण, दोन्ही महापालिकांवर भगवा फडकला नाही. त्यासाठी शिवसेनेला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे, अशी खंत व्यक्त करून खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘बाळासाहेबांनी सामान्यातील सामान्य माणसांना राजकारणात आणले. ज्यांची ओळख नाही, चेहरा नाही, अशांना पदांवर बसविले. शिवसेनेत निष्ठेला महत्त्व आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT