पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो, उद्या सायंकाळी सहापर्यंत दुकाने खुली राहणार; मात्र...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनचा नियम आज मध्यरात्रीपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी सायंकाळी काढला. दुकानांमध्ये संभाव्य गर्दी टाळण्यासाठी 19 ते 23 जुलै कालावधीत अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, शेतकरी आठवडे बाजार, भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाले, मटण, चिकन, अडी, मासे विक्रीची दुकाने रविवारी (ता. 19) सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत. सोमवारपासून (ता. 20) या दुकानांची वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा अशी असेल. 

पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाउनचे पहिले पाच दिवस शनिवारी पूर्ण झाले. आता रविवार, उद्यापासून (ता. 19) 23 जुलैपर्यंत काही अटी व नियम शिथिल केले आहेत. सोमवारपासून (ता. 20) सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्‍यक वस्तुंचा पुरवठा करणारी किरकोळ व ठोस विक्रीची दुकाने, शेतकरी आठवडे बाजार, भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाल्यांमार्फत विक्री, मटण, चिकन, अडी, मासे विक्रीची दुकाने सुरू राहतील. 

पेट्रोल व गॅस पंपांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा राहील. मात्र, केवळ सरकारी वाहने, अत्यावश्‍यक सेवा आणि पुरवठा साखळीतील वाहनांनाच इंधन मिळणार आहे. तसेच, कंपन्या नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, कामगारांना स्वतःच्या वाहनाने ये-जा करता येणार आहे. मात्र, कामगारांनी कंपनीतील मनुष्यबळ विभागाचे (एचआर) पत्र व कंपनीचे ओळखपत्र जवळ ठेवायचे आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू ठेवता येणार आहे. शक्‍य असल्यास त्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसुद्धा कंपनीने दिलेला पास व ओळखपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. पोलिसांनी अडविल्यास ते दाखवून पुढील प्रवास करावा लागणार आहे. 

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT