पिंपरी-चिंचवड

'पीसीएमसी'चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कोरोना रिपोर्ट समोर; म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : 'गेल्या शुक्रवार व शनिवारी मी कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलो. त्यामुळे कालपासून मी होम क्वारंटाईन झालो. इतर हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील व्यक्तींप्रमाणे माझेही स्वॅब घेण्यात आले. योग्य काळजी घेतल्यामुळे त्यांच्यासह माझेसुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत,' असे सांगून पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाष्य केले. 

- घराबाहेर जाताना मास्क वापरा
- दुसऱ्याशी बोलताना दोन मीटर अंतर ठेवा
- हात वारंवार धुत रहा
- गरम पाणी पीत रहा
- प्रतिकारशक्ती वाढविणारे अन्न घ्या,'' असे पंचसूत्री आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अविष्कार हा सरकारी बंगला पिंपरी-चिखली रस्त्यावर मोरवाडी ते केएसबी चौकादरम्यान आहे. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर महापालिकेतर्फे सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यातील एका सुरक्षा रक्षकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आयुक्त स्वतः होम क्वारंटाइन झाले असून बंगल्यातूनच त्यांनी कामकाज सुरू केले आहे. त्यांच्यासह बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रवाचे नमुने मंगळवारी तपासण्यात आले. सर्वांचे रिपोर्ट रात्री उशिरा आले. सर्व निगेटिव्ह. त्यानंतर आयुक्तांनी आपली भावना व्यक्त केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त हर्डीकर यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर व्यक्त केलेली भावना आयुक्तांच्याच शब्दांत....
I was exposed to Corona positive persons on Friday and Saturday. So I had gone into Home Quarantine since yesterday. My swab was collected along with other high risk contacts at our residence. Thankfully, all have come negative. It is just because of due precautions that we take. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1. Wear mask while going out
2. Maintain at least 2 m distance with others while interacting
3. Keep hand hygiene 
4. Drink plenty of water preferably warm water
5. Eat food that boosts your immunity

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आयुक्त हर्डीकर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्यातील एका पदाधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना संसर्ग झाला आहे. हेच पदाधिकारी शुक्रवारी आयुक्तांसमवेत सुमारे तासभर होते.

आयुक्त कक्षात त्यांची बैठक झाली होती. शिवाय, अन्य अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत आयुक्तांचा संपर्क येतच होता. म्हणजेच सतत ते हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये येत आहेत. सध्या होम क्वारनटाइन होऊन त्यांनी घरातून कामकाज सुरू केले आहे.

काळजी घेऊनही संसर्ग...

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका भवन व अन्य विभागीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मलगनद्वारे कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणी केली जात आहे. प्रवेशद्वारांसह प्रत्येक दालनात सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. स्वच्छतागृहातील नळांना हात लागू नये, यासाठी सेंसर असलेले नळ बसविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या बंगल्यावरही अशीच व्यवस्था आहे. तरीसुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT