Hording sakal
पिंपरी-चिंचवड

होर्डिंगमधून राजकीय ‘एन्ट्री’चे संकेत

तरुणाईला वेध पालिका निवडणुकीचे; जनसंपर्क वाढविण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘आपल्या भागाला हवे नवीन व तरुण नेतृत्व’, ‘आता नगरसेवक आपणच’, ‘शहर विकासाचा ध्यास, जनतेचा... वर विश्‍वास’, ‘आपला युवा नेता...’, ‘टार्गेट विकासाचं, स्वप्न ... भावाचं’, ‘आता मागे हटायचं नाय, निवडणूक लढवायची हाय’, अशा स्वरूपाचे मोठमोठे होर्डिंग शहरात दिसू लागले आहेत. त्यावर तरुणाईने व्यक्त केलेले संदेश, महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे संकेत देत आहेत. (PCMC News)

सांगली, कोल्हापूरसह कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनाचे, त्यांना मदत दिल्याचा संदेश देणारे होर्डिंग तरुणांना लावले आहेत. त्यासह वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगच्या माध्यमातूनही निवडणूक लढण्याचा संकेत त्यांनी दिला आहे. स्वतःच्या नावासह राजकीय पक्षाचे नाव व पदही नमूद केले आहे.

राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह विविध सेल व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या महिला, युवक, युवती, कामगार, विद्यार्थी, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक, वकील, डॉक्टर यांसह जाती व प्रादेशिक सेल आहेत. त्यांतील अनेक जण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसते आहे. त्यासाठी काहींनी ‘युवा नेते’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘तरुण नेतृत्व’, ‘तडफदार नेता’, ‘आपला सेवक’, ‘आपला भाऊ’, ‘दादा’, ‘नाना’, ‘अण्णा’, ‘तात्या’ अशी नानाविध नामाभिधाने लावली आहेत.

जनसंपर्क कार्यालये

महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्याची तयारी विद्यमानांसह माजी नगरसेवक आणि अन्य इच्छुकांनीही सुरू केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत गायब झालेले व फारसे चर्चेत नसलेल्या कार्यकर्त्यांसह ‘काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच’ असा चंग बांधून अनेक नवीन चेहऱ्यांनी आपापल्या भागात संपर्क कार्यालये सुरू केली आहेत. त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधला जात आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्या केंद्रांची माहिती एक दिवस अगोदर जाहीर केली जाते. त्या केंद्रांची यादी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपापल्या भागात व्हायरल करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयन्तही काही जण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT