पिंपरी-चिंचवड

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामशेतकरांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ) : खडकाळ्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहा दिवसांचा 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. त्यामुळे सत्तर गावांची असलेली बाजारपेठ सहा दिवस बंद राहील. शहरातील नागरिक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते व व्यापाऱ्यांनी हा कर्फ्यू पुकारला आहे. त्यानुसार शनिवार (ता. 5) ते गुरुवार (ता. 10) यादरम्यान शहरातील सर्व व्यावहार बंद राहतील. 

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. खडकाळ्यात आतापर्यंत सुमारे 150 जणांना लागण झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. या काळात शहरातील दवाखाने व मेडिकल सुरू राहतील. तसेच दूध व जनावरांच्या खाद्याची दुकाने, खते, बी-बियाणांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान सुरू राहणार आहेत. सर्वांनी नियमांचे पालन करून घरातच थांबायचे आहे. यासाठी विभागवार समिती तयार केली असून, नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील व्यापारी बांधवांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे तसेच, दुकानात सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे. ज्या भागामध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत, तो भाग सॅनिटायझ करून घेणे, रुग्णाच्या घरातील व संपर्कातील सदस्यांना आयसोलेशन करणे, ही कामे प्रशासनाने तातडीने करून घ्यावीत, असे निर्णय नागरिक व व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी शहरातील सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • सहा दिवस कडकडीत बंद 
  • दवाखाने, मेडिकल सुरू राहणार 
  • खते, बी-बियाणांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान सुरू 
  • नियम न पाळणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT