पिंपरी-चिंचवड

मावळात सहा जण कोरोनामुक्त; तळेगाव स्टेशन, माळवाडी, चांदखेड येथील रहिवासी

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात आढळलेल्या १६ कोरोना रुग्णांपैकी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ७९ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले.                    

माळवाडी, तळेगाव स्टेशन, चांदखेड, नागाथली, अहिरवडे, वेहेरगाव येथे आढळलेले रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मावळ तालुक्यात तळेगाव स्टेशन येथे पहिला व माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर तालुक्यात बाहेरून विशेषतः मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या वाढत गेली व त्या बरोबर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली. महिनाभरात शहरी भागात सहा तर ग्रामीण भागात दहा रुग्ण आढळून आले. अहिरवडे, नागाथली, वेहेरगाव, चांदखेड, घोणशेत, कामशेत, परंदवडी, तळेगाव दाभाडे, खंडाळा या गावांमध्ये सलग रुग्ण आढळले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चांदखेड येथील रुग्णाच्या संपर्कातील चार व खंडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. परंतु, गेल्या चार दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. १६ पैकी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील ७९ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. सध्या कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसल्याची माहिती डॉ. लोहारे यांनी दिली.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा                             

बाहेरच्यांची आवक सुरूच                      
लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने व स्थलांतराला शासनानेच मुभा दिल्याने तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांची आवक सुरूच आहे. दररोज सरासरी शंभर ते सव्वाशे व्यक्ती येत आहेत. आत्तापर्यंत ९ हजार ७०५ व्यक्ती आल्या आहेत. त्यात मुंबईहून आलेल्यांची संख्या अधिक आहे. बाहेरून आलेल्या ७ हजार ३११ व्यक्तींचा होमक्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या २ हजार ४९४ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT