Six students of Pimple Gurav Primary School have achieved success in the scholarship examination 
पिंपरी-चिंचवड

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे यश; शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले

आशा साळवी

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (ता. 12) जाहीर झाला. या परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले. पाचवीचे सोळा तर आठवीचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेकडून 16 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. यंदा शहरातील 12 हजार 724 विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती दिली. पाचवीच्या सात हजार 946 विद्यार्थ्यांनी, आठवीच्या चार हजार 778 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल नऊ ऑक्‍टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यात महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी यंदा चांगले यश मिळवीत पाचवीतील विद्यार्थ्यांनी अंजली त्रिमुखे, अनुसया स्वामी, वैष्णवी सगर, राम कुलकर्णी, स्नेहा मालकट्टे, कलावती जमादार (पिंपळे गुरव प्राथमिक शाळा), प्राजक्ता डोंगरे (मोशी कन्या प्राथमिक शाळा), आकाश लवकुश कश्‍यप (मोशी मुले प्राथमिक शाळा), रोहन जगताप (वाकड मुले प्राथमिक शाळा), महम्मद मसूद रजा अब्दुल माजीद खान, हुजेफा अहमद (मरहुम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा), सुदीप सूर्यवंशी (शेवंताबाई जगताप प्राथमिक शाळा वैदुवस्ती), सुहानी मोहिते (कुदळवाडी प्राथमिक शाळा), सिद्धार्थ गायकवाड(बोराडेवाडी प्राथमिक शाळा), मिजबा पटेल, उत्कर्ष कांबळे (मुले-मुली2/2 निगडी) तर आठवीचे विद्यार्थ्यांमध्ये गौरी वाघमारे (थेरगाव माध्यमिक विद्यालय), श्‍याम हांगे व ज्ञानसागर मिसाळ (जाधववाडी मुले प्राथमिक शाळा), अनिल केवट (छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी), प्रतिज्ञा हुलावळे (मोशी कन्या प्राथमिक शाळा) आदींचे गुणवत्ता यादीत नाव झळकले आहे. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT