पिंपरी-चिंचवड

Video : प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे परप्रांतीय तरुणांनी उचललं हे पाऊल...

सुवर्णा नवले

पिंपरी : कोलकाता येथील नदिया गाव गाठण्यासाठी 'त्या' तरुणांनी पिंपरी बाजारपेठेतून सहा सायकल खरेदी केल्या. तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास ते वीस रात्रीतून पूर्ण करणार आहेत. 

सुमारे 18 ते 20 वर्षांच्या सहा तरुणांनी सायकल खरेदी केल्या. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सायकल खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. मात्र, आई-वडील आणि नातेवाइंकानी त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले. त्यामुळे ते सायकल घेऊ शकले. त्यानंतर ते शनिवारी (ता. 9) रात्री आठ वाजता ते कोलकात्याच्या दिशेने निघाले. त्यांनी गरजेपुरते कपडे, पाणी आणि पंक्चरचे साहित्य सोबत घेतले. त्यांच्या जवळ खाण्यासाठी काहीही नव्हते. केवळ घरी संपर्क करण्यासाठी सर्वांनी मोबाईल चार्जिंग करून घेतले होते.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राजेश म्हणाला,  "आमचा देवच आम्हाला आमच्या घरी पोचविणार आहे. आम्ही सरकारकडे मदत मागणार नाही. आम्हाला कोणाचीही मदत नको. दोन वेळा आम्ही प्रयत्न करूनही आम्हाला प्रमाणपत्र आणि मदत मिळाली नाही. आम्ही पिंपरीतील हॉटेलमध्ये काम करून महिन्याकाठी दहा हजार रुपये कमवत होतो. तसेच, उरलेले पैसे गावी पाठवित होतो. परंतु, त्या मालकानेही पैसे दिले नाहीत. आमचे आई-वडील दररोज आमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत. त्यामुळे आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे."

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बाप्पा से, राजेश से, राहुल से, इब्राहिम से, रिटॉन व इंसान से हे प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेविषयी संताप व्यक्त करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT