पिंपरी-चिंचवड

मणप्पूरम फायनान्सच्या पिंपरी-चिंचवडमधील सोळा शाखा बंद! 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : वेतन प्रश्न व इतर विविध मागण्यांसाठी मणप्पूरम फायनान्स कंपनीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे राज्यातील 210 शाखा बंद असून, यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील सोळा शाखांचा समावेश आहे. शहरातील सुमारे पन्नास हजार ग्राहकांचे सोने अडकले असून, हे ग्राहक हवालदिल झाले आहेत. तारण ठेवलेले सोने परत मिळणार की नाही, याची चिंता अनेक ग्राहकांना सतावत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध मागण्यांसाठी मणप्पूरमच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली मागील वीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यात शहरातील सोळा शाखांच्या 80 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगारही व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यासह शाखा बंद असून, हजारो ग्राहकांचे सोने अडकले आहे. लग्नसराईमुळे ग्राहक तारण ठेवलेले सोने परत घेण्यासाठी येत आहेत. मात्र, शाखेला कुलूप असल्याचे पाहून पायाखालची अक्षरश: जमीनच सरकत आहे. 

यामुळे पुकारलाय संप 

  • एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत न दिलेला पगार 
  • स्थानिक रिजनमधून इतर रिजनमध्ये होणाऱ्या बदल्या 
  • प्रत्येक महिन्याला पगारातून होणारी बेकायदेशीर कपात 
  • कामगारांना वार्षिक सुट्या मिळत नसून सुट्या घेण्याचा अधिकार नाही 
  • पगारवाढ नाही 
  • कामगारांसह त्यांच्या कुटुंबाला कंपनीकडून इन्शुरन्स नाही 
  • फ्रॉड ग्राहकांवर कारवाई न करता त्यांची सर्व वसुली कामगारांच्या पगारातून केली जाते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT