Soon Corona Treatment Center will start at the samudra Institute 
पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यात सुरु होणार ३८० बेडचे कोरोना उपचार केंद्र

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्व कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी टाकवे खुर्द येथील समुद्राइन्स्टिट्यूटमध्ये खासगी डॉक्टरांच्या मदतीने ३८० बेडचे कोविड उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील उपचार सुविधांचा आढावा घेण्यासाठी वडगाव येथील पंचायत समिती सभागृहात आमदार शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.  प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसुदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे , गटविकास अधिकारी सुधीर भागवत, डॉ. गुणेश बागडे, डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. दिलीप भोगे आदी उपस्थित होते. 

- पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर

आमदार शेळके यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने सर्व रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्यक आहेत. मात्र यासाठी उपलब्ध असणारे डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांची कमतरता येऊ नये यासाठी टाकवे खुर्द येथील समुद्र इन्स्टिट्यूट मध्ये तत्काळ ३८० बेडच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल. याठिकाणी खासगी डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय व इतर खासगी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यात येतील. खासगी दवाखान्यातील डॉक्टर्स व कर्मचारी यांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच हे कोविड केअर सेंटर सुरु होईल. 

- सरकारी कर्मचारी बदल्या रद्दचा 'नांदेड-लातूर पॅटर्न' पुण्यात राबवा​

 खासगी रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केल्यास त्याचे अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांना वेळेत दिले जात नसल्याने पुढील कारवाई करण्यास विलंब होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कोरोना चाचणीचे अहवाल त्वरित तालुका आरोग्य अधिकारी यांना सादर करण्याच्या  सूचना यावेळी देण्यात आल्या.
छायाचित्र- वडगाव मावळ: मावळ पंचायत समितीमधील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सुनील शेळके सोबत मधुसूदन बर्गे, संदेश शिर्के, डॉ.चंद्रकांत लोहारे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT