pune sakal
पिंपरी-चिंचवड

कृत्रिम घरट्यांत चिमण्या लेकुरवाळ्या

मावळात संवर्धन व प्रजनन प्रकल्प; हजार घरट्यांतून पाचशे पिल्लांची गगनभरारी

गणेश बोरुडे ​

तळेगाव स्टेशन : पर्यावरणाच्या असमतोलामुळे कधीकाळी अगदी मानवी वस्तीला भिनलेली मैना आणि चिमण्यांची प्रजातीत सिमेंटच्या जंगलात हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे. मात्र, संवर्धन आणि प्रजनन प्रकल्पातील घरट्यांतून हीच दुर्मिळ होत चाललेली चिमणी, मैना मावळात लेकुरवाळी बनलेली पाहायला मिळत आहे. नागरिकीकरणासह विकासकामांच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अमाप वृक्षतोड, निसर्गाचा असमतोल आणि पर्यायाने जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पशुपक्षी नामशेष होत चालले आहेत. (PCMC News)

सिमेंट काँक्रिटच्या जंगलात घरटयांचा आसरा न मिळाल्याने मानवी जीवनाचा जवळचा घटक असलेला चिमणी पक्ष्यांची संख्या अलीकडे झपाट्याने कमी झाल्याची जाणवते. दैनंदिन अंगणात खेळणारी आणि असाल वृद्धांच्या मनात घर केलेली चिमणी शहरात सहजासहजी पहावयास मिळत नाही. कृत्रिम घरट्यांचा वापर करून चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या हेतूने चिमणीच्या संवर्धन आणि प्रजननासाठी अविनाश नागरे यांनी चिमण्या मैनेला हक्काचे घरटे देण्याचा उपक्रम हाती घेतला.

गेल्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने रोटरीने सुरू केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गोल मोकळी खोकी, छोटी लाकडी खोकी, पुठ्ठ्याच्या पुंगळ्या या छत, खिडक्या, व्हरांडा, झाडे आदी ठिकाणी बसवून त्यात कापूस आणि झाडांची वाळली पाने, काड्या पसरून चिमणीला गालीचा तयार करत घरटी बनवली.

पिलांच्या संगोपनाची माहिती आणि प्रगती कळविण्यासाठी व्हाटसअॅप ग्रुप तयार केले आहेत. आतापर्यंत प्राप्त आकडेवारीच्या नोंदीप्रमाणे बसविलेल्या जवळपास एक हजारांपैकी साधारणतः पावणेदोनशे घरट्यांतून चिमण्या लेकुरवाळ्या होऊन अंदाजे पाचशेपेक्षा अधिक पिल्लांनी आपल्या पंखावर गगनभरारी घेतली आहे.

यापैकीच काही घरट्यांतून मैनेची साधारणतः दहा पिल्ले बाहेर आल्याचे रोटरीचे प्रकल्प प्रमुख अविनाश नागरे यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष संतोष शेळके, पक्षीमित्र सचिन मखामले, महेश परदेशी, ओंकार वर्तले, रोहित नागलगावकर, वैशाली खळदे, रेश्मा फरतडे, अथर्व कडलग आदींचे विशेष सहकार्य याकामी नागरे यांना लाभत आहे.

इथे बसविली कृत्रिम घरटी

तळेगाव दाभाडे : ४६०

मावळ तालुका : ११०

पुणे शहर : ४५

पिंपरी-चिंचवड : ७५

खडकी कारखाना : ३०

कोल्हापूर-सांगली : १५०

थायसन क्रृप पिंपरी : १५०

एकूण घरटी : १,०२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT