sakal vidya sakal
पिंपरी-चिंचवड

SSC Student : दहावीनंतर काय? आजच जाणून घ्या चर्चासत्रात!

दहावीनंतरचे उच्च शिक्षण याबाबत, विद्यार्थी व पालकांसाठी ‘सकाळ विद्या’ आणि ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी व ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमी यांच्यातर्फे आज शनिवारी (ता. १०) चर्चासत्र आयोजित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि दहावीनंतरचे उच्च शिक्षण याबाबत, विद्यार्थी व पालकांसाठी ‘सकाळ विद्या’ आणि ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी व ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमी यांच्यातर्फे शनिवारी (ता. १०) चर्चासत्र आयोजित केले आहे. याचा लाभ सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी पाच वाजता चर्चासत्रास सुरवात होईल. शालेय अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धत, विषयानुरूप योग्य नियोजन व आकलनावर भर असेल. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असेल, या अनुषंगाने अभ्यास व वेळेचे नियोजन कसे असावे, अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता कसे सामोरे जावे, याविषयी समुपदेशन केले जाणार आहे.

क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे नौशाद शेख आणि लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे इम्रान शेख मार्गदर्शन करतील. दहावीनंतर मेडिकल, इंजिनिअरिंग याव्यतिरिक्त उपलब्ध करिअरचे पर्याय व अन्य परीक्षा, त्यांची तयारी व नामांकित शिक्षण संस्था याविषयीही मार्गदर्शन मिळेल.

काय? कधी? कुठे? केव्हा?

काय? : ‘दहावीनंतरचे शिक्षण’ विषयावर चर्चासत्र

कधी? : शनिवार, ता. १० जून

कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

केव्हा? : सायंकाळी ५ वाजता

संपर्क : ८३७८९८७८३६, ९९२२२४७५५६

प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य , नावनोंदणी आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारासह निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सचा छापा, १० कोटींची रोकड जप्त; वऱ्हाडी बनून पोहोचले अधिकारी

ACB चा मोठा दणका! पोलिस उपनिरीक्षकासह मुख्याध्यापकाचा 'काळा' कारनामा कॅमेऱ्यात कैद; एकाने मागितले 50 तर दुसऱ्याने मगितली 25 हजारांची लाच!

Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : फी न भरल्याने विद्यार्थिनीला काढणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Kidney Racket: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी; आरोपींची संपत्ती गोठविणार, गृहराज्यमंत्री भोयर

SCROLL FOR NEXT