पिंपरी-चिंचवड

एसटी कर्मचाऱ्यांचा पिंपरीत आकांत

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास २१९ एसटी आगारांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेल्या आठ वर्षापासून वेतनवाढ नाही. बारा वर्षांच्या सेवेत पंधरा हजारावर गुजराण करावी लागतेय, अल्प पगारात मुलांना शिक्षण देण्यास आम्ही सक्षम नाही. लाख रुपयाचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. जगावं की मरावं ! अशी मनःस्थिती बनली. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच राज्य सरकार आमची दखल घेणार ? तुटपुंज्या पगारावर आयुष्य काढणे आता कठीण असल्याचे एसटीच्या वल्लभनगर आगारातील वाहक संतोष वाघमारे सांगत होते. त्यांच्यासारखीच शेकडो कर्मचारी आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलनाची धार अधिक तीव्र झालेली पाहायला मिळाली.

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास २१९ एसटी आगारांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न जटिल बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्‍वासन मिळत नाहीये, असे यांत्रिक गोपाल हिरे सांगत होते. ‘३३ वर्षापासून सेवा देऊनही शासन दखल घेईना. अद्याप किमान वेतन आयोगानुसार वेतन मिळालेले नाही. एकाने आत्महत्या केल्यावरच महामंडळ वेतनाची तरतूद करते. कुटुंब व्यवस्था ढासळली आहे.’

महिला वाहक अश्‍विनी गायकवाड सांगतात की, गेल्या बारा वर्षाच्या सेवेत महागाईच्या तुलनेत छदाम वाढ झालेली नाही. मला लहान मुलगा आहे. त्याला घरी सोडून १२ तासांच्यावर लांब पल्ल्याची ड्यूटी करावी लागतेय. कामाचे तास जास्त, मोबदला कमी आहे. वेळेवर वेतन नसल्यामुळे ९० टक्के कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये मोठी तफावत आहे. तुलनेने बोनस कमी दिला आहे.’

वाहक हसीना शेख यांनी कर्मचाऱ्यांभोवती कर्जाचा फास का आवळला जात असल्याची कारणे सांगितली. त्या सांगतात, ‘मला दोन मुलं आहेत. अनियमित पगारामुळे कर्जबाजारी होत आहोत. १३ टक्के व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. निवृत्त होईपर्यंत कर्ज फिटणार नाही. सगळ्याच बाजूने एसटी कर्मचारी वैतागला आहे.’

दरम्यान, आंदोलक चालक अनिल पाटील, विजय पाटील, बळिराम माने, ओमप्रकाश गिरी, यशवंत जाधव, प्रवीण जाधव, बजरंग ठाकरे, रावसाहेब लंके, संदीप सुतार, गुलाब शेख, सुधाकर पाडळकर, अशोक नगरकर, विशाल लामचुरे,कमलाकर चव्हाण, बाळासाहेब कांबळे, राजाभाऊ गिते आदींनी विविध गाऱ्हाणी मांडली

मुंडण करून निषेध

ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मुंडण करून निषेध केला. आगाराचे मेकॅनिक प्रवीण मोहिते, वाहक विजय जाधव, चालक गौतम इंगळे आणि प्रवीण जाधव यांनी मुंडण करून सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT