ST s Ashtavinayak Darshan Yatra start from Sankashti Chaturthi msrtc pimpri esakal
पिंपरी-चिंचवड

एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा संकष्टी चतुर्थी पासून पुन्हा सुरू!

संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (ता.१७) पासून चतुर्थीच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांना अगोदरच तिकिटे बुक करावी लागणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनामुळे बंद पडलेली एसटी महामंडळाची ‘अष्टविनायक दर्शन’ यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (ता.१७) पासून चतुर्थीच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांना अगोदरच तिकिटे बुक करावी लागणार आहेत. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुखांनी केले आहे तोट्यात चालविल्या जाणाऱ्या एसटी महामंडळास नफ्यात आणण्यासाठी सध्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे.

प्रवाशांशी संवादही साधला जात आहे, ‘प्रवासी वाढवा अभियान’ही राबविले जात आहे. असे असले तरीही खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढताना दिसत नाही. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढणेच सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने महामंडळाने ‘अष्टविनायक दर्शन’ यात्रा सुरू केली आहे. दोन दिवसांच्या या यात्रेसाठी प्रवाशांना तिकीट अगोदरच बुक करावे लागणार आहे. ओझर येथे प्रवाशांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड बस स्थानकातून देण्यात आली. तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याचे स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी सांगितले.

असे करा आरक्षण

यात्रेचा मार्ग वल्लभनगर, शिवाजीनगर , मोरगाव, सिद्धटेक, थेऊर, रांजणगाव, ओझर (मुक्काम), लेण्याद्री, महड, पाली...असा असणार आहे. त्यासाठी या बसचे आरक्षण जवळच्या बस स्थानकात एसटीच्या www.msrtcors.in ऑनलाइन वेबसाईटवर / अप्लिकेशनच्या माध्यमातून देखील करता येईल. सध्या बुकिंग सुरू झाले आहे. या फेरीचे आरक्षण करण्याकरिता ‘पिंपरी चिंचवड अष्टविनायक दर्शन’’ ‘‘CNWD -- ATHVNK" या सांकेतिक कोडचा वापर करावा.

राहण्याची व्यवस्था

संस्थांच्या हॉल मध्ये सवलतीच्या दरात मुक्काम व भोजनाची सोय होईल. त्याचा व जेवणाचा खर्च प्रवाशी भक्तांनी करावयाचा आहे. अष्टविनायक यात्रा संकष्टी चतुर्थी च्या दिवशी सुरू होऊन, संकष्टी चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी सांगता होईल, एक दिवसीय ओझरला मुक्काम राहील. तरी इच्छुक गणेश भक्तांनी स्थानक प्रमुख, आगाऊ आरक्षण कक्ष, ऑनलाइन माध्यमातून आपले तिकीट आरक्षित करावे, जास्तीत जास्त गणेश भक्तांनी अष्टविनायक यात्रा बस चा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT