PMP Bus Sakal
पिंपरी-चिंचवड

'पवना खोऱ्यात पीएमपीएल सुरू करा'

माजी सभापती दळवी यांची पुण्याचे महापौर मोहोळ यांच्याकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांच्या सोयीसाठी मावळ तालुक्यातील पवना खोऱ्यात पीएमपीएलची बससेवा सुरू करावी, असे साकडे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना घातले आहे.

दळवी यांच्यासह पवना धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष दशरथ शिर्के, दूध सोसायटीचे अध्यक्ष भरत आडकर, तुषार दळवी आदींनी पुण्यात महापौर मोहोळ यांची भेट घेऊन पवना खोऱ्यातील बससेवेबाबत चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. सध्या एसटीच्या संपामुळे पवन मावळातील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, मजूर आदी सर्व घटकांच्या दळणवळणाची मोठी गैरसोय झाली आहे. पवना खोऱ्यातील ६५ गावे त्यात पवनानगर सोमाटणे मार्गावरील २५ ते ३० गावे, पौड ते पवनानगर मार्गावरील २५ ते ३० गावे व कामशेत पवनानगर मार्गावरील गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे.

एरवीही तळेगाव आगारातून चालणाऱ्या एसटी सेवेतही ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. जुन्या झालेल्या गाड्यांमुळे नादुरुस्तीचे प्रमाण, चालक व वाहकांची कमतरता, त्यामुळे सेवेत होणारी अनियमितता आदी बाबींमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात पीएमपीएलची बससेवा सुरू झाल्यास त्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुलभ होईल. मनपा ते पौड मार्गे पवनानगर, मनपा ते सोमाटणेमार्गे पवनानगर व मनपा ते कामशेतमार्गे पवनानगर अशी बससेवा सुरू केल्यास पवन मावळातील अनेक गावांना त्याचा लाभ होईल. पुण्यातून अनेक पर्यटक पवना धरण व परिसरात पर्यटनासाठी येत असतात. या भागातून बससेवा सुरू झाल्यास त्यांचीही गैरसोय दूर होईल व पर्यटनास आणखी वाव मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT