Selling
Selling Sakal
पिंपरी-चिंचवड

शटर बंद करून विक्री सुरू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - लॉकडाउनचा (Lockdown) कालावधी अनिश्चित असल्याने छोटे व्यावसायिक (Small Businessman) चोरून लपून विविध वस्तू व सेवा (Service) देऊ लागले आहेत. छोटे हॉटेल, लहान-लहान टपरी दुकाने सर्रासपणे सुरू झाली आहेत. दुकाने पूर्णपणे बंद (Close) न ठेवता दुकानांचे अर्धवट शटर (Shutter) सुरू ठेवून वस्तूंची विक्री सुरू आहे. कर्मचारी किंवा कुटुंबातील एखादा सदस्य दुकानापुढे उभा करून गिऱ्हाइकांना (Customer) हवे नको ते विचारपूस करत असल्याचे दृश्य शहरात नजरेस पडत आहे. दुकान आस्थापना खुल्या ठेवून पुरेपूर नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांच्या (Police) कारवाईची (Crime) भीती देखील दुकानदारांना उरली नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. (Start selling by closing the shutter Pimpri Chinchwad)

कासारवाडी, सांगवी, वल्लभनगर, भोसरी परिसरात टपरी दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. पान ठेलेवाल्यांचीही खुलेआम विक्री सुरू आहे. मोबाईल दुकानाबाहेरही हीच स्थिती आहे. पिंपरीतील कॅंम्पमध्ये दिवसाढवळ्या गर्दी होत आहे. पोलिस यंत्रणा तुटपुंजी पडत आहे. विक्री सुरू होऊनही या दुकानदारांकडे डोळेझाक केली जात आहे. शहरातील इतर परिसरातही हाच प्रकार काही अंशी सुरू आहे. बऱ्याच जणांनी तंबाखू व सिगारेटच्या दुकानांचे फोन नंबर घेऊन ऑर्डर मागविल्या जात आहेत. ठोस कार्यवाही होत नसल्याने दंडाच्या भीतीचा काहींनीच धसका घेतला आहे. परंतु, नियम मोडणाऱ्यांना चांगला धडा शिकवावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.

किती आहे दंड?

  • २५०० - दुकाने खुलेआम सुरू

  • ५००० - दुसऱ्यांदा पुन्हा दुकाने खुली

  • ७५०० - तिसऱ्यांदा पुन्हा दुकाने खुली

  • १०,००० - हॉटेल, बार व रेस्टॉरंट खुले

मैं रोज चाय और वडापाव बेचती हूं। मेरे पती गाँव गए, उधर ही फंस गए। बच्चों को तो भुका नहीं रख सकती। दुकान का भाडा भी नहीं भरने हो रहा हैं। मैं चाय बेचती हूं। रोज सुबह पुलिस आते हैं और चौकी आ जाओ बोलते हैं। गरीबों कोही परेशान करते हैं। पिछली बार मुझसे पुलिस दीड हजार रुपये लेकर गए, अब दस हजार माँग रहे हैं। कहाँ से पैसा देने का?

- चहा विक्रेती महिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले..

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT