पिंपरी-चिंचवड

मोठी बातमी : कंपन्या सुरू करण्यास परवानगी; 'या' भागातील उद्योग होतील चालू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या 52 दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील थांबलेला यंत्रांचा खडखडाट सुरू होणार आहे. कारण शहरातील कंटेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी (ता. 14) परवानगी दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या बाबतचा आदेश काढला. मात्र, कपंन्यांना 33 टक्के कामगारांच्या साहाय्यानेच कामकाज करावे लागणार आहे. 

लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून हे उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक उद्योग अडचणीत आले होते. लॉकडाउन वाढल्याने निराश झालेले अनेक कंत्राटी कामगार गावाकडे निघून गेले. त्यामुळे कंपनी सुरू करताना उपलब्ध मनुष्यबळातच मालकवर्गाला कामकाज करावे लागणार आहे. शहरातील उद्योजकांच्या संघटनांनी कंपन्या सुरू करण्याची मागणी सरकारकडे सातत्याने लावून धरली होती. कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी शहरातील कामगार असायला हवेत. कंपनीची बस अथवा चारचाकी वाहनातूनच कामगारांनी प्रवास करायचा आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोन वगळूनच परवानगी 

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, "कंटेन्मेंट झोन वगळून शहरातील उद्योग करण्यास परवानगी दिली आहे. त्याच्या काही अटी-शर्ती आहेत. या बाबतचे आदेश शुक्रवारी (ता. 15) काढण्यात येतील. दुचाकीवरून कोणीही ये-जा करू शकणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यत्रांच्या दुरुस्तीचे आव्हान 

अनेक दिवस कंपन्या बंद असल्याने तेथे मालकांना स्वच्छता करून घेण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र, एवढ्या कंपन्यांना सफाई कामगार मिळणे अवघड असल्याने कामावर येणाऱ्या कामगारांनाच साफसफाईची कामे करावी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यंत्रेही बंद असल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना मोठी मागणी राहील."

आकडे बोलतात 

  • शहरातील उद्योगांची संख्या - 11000 
  • संघटित कामगार - 1,00,000 
  • असंघटित कामगार - 300,000 हून अधिक 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या सुट्या भागांसाठी पिंपरी-चिंचवडवर अवलंबून आहेत. त्यांना सुटे भाग मिळत नसल्यामुळे या कंपन्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. 

- दीपक फल्ले, अध्यक्ष - लघुउद्योग भारती (उद्योजकांची संघटना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

SCROLL FOR NEXT