पिंपरी-चिंचवड

भोसरीतील विद्यार्थिनीच्या पत्राची राज्य सरकारला घ्यावी लागली दखल 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शाळा सुरू करण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनही भांबावलेले आहे. अशातच शाळांना सॅनिटायझरचा खर्च कोण देणार आणि त्याविषयीच्या निधीची माहिती भोसरीतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने थेट राज्य सरकारला मेलद्वारे पत्र पाठवले आहे. त्याची दखल देत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्थानिक प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप तिला माहिती उपलब्ध झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. 

नचिकेता नीलेश गायकवाड असे विद्यार्थिनीचे नाव असून, ती चिंचवड-मोरवाडीतील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालयात शिकते. 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापालिका शाळा वगळता खासगी शाळांना कुठल्याही प्रकारचे सॅनिटायझर, ऑक्‍सीमीटर आणि थर्मल गन देण्यात येणार नव्हते. त्याबाबत तिने राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळांना वितरित करण्याच्या साहित्याबाबत उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या तपशिलाबाबतची मेलद्वारे पत्र लिहून माहिती मागविली होती. याची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी तिला उत्तर पाठविले. त्यात म्हटले आहे की, " ही माहिती पिंपरी महापालिका शिक्षण विभागाची संबंधित असल्यामुळे कलम 6 (3) अन्वये आपल्या अर्जाची मूळ प्रत या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे कळविले आहे. या अर्जावर कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. परंतु अद्याप महापालिकेने नचिकेताला माहिती दिली नसल्याचे समजते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. परंतु महापालिकेकडून अद्याप माझ्या पत्राची दखल घेतली नाही. यावरून प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. '' 
- नचिकेता गायकवाड, विद्यार्थिनी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT