पिंपरी-चिंचवड

जगताप कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे मदत, तर गृहमंत्र्यांनी सांत्वन करताना दिलं हे आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील तरुण विराज जगताप याचा गेल्या आठवड्यात खून झाला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सांत्वन केले. राज्य सरकारतर्फे सव्वाचार लाख रुपये मदतीचा धनादेश विराजच्या आजीकडे सुपूर्द केला. 

जगताप कुटुंबाला सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळेल, खटला लढण्यासाठी सरकारतर्फे वकील दिला जाईल. जगताप कुटुंबीय सांगतील, त्या वकिलांची नियुक्ती यासाठी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले. विरोधी पक्षनेते नाना काटे, पोलिस आयुक्त संतोष बिष्णोई आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विराजचा सात जून रोजी खून झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, काही समाजकंटकांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ तसेच अफवा प्रसारित केल्या जात होत्या. याबाबत, "सोशल मीडियावरील प्रक्षोभक व चिथावणीखोर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सामाजिक, जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊन शांतता व सुव्यवस्था राखावी. अफवांवर विश्‍वास ठेवू नये,' असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतर हे प्रकार थांबले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, पिंपळे सौदागर येथील विराज जगतापच्या खून प्रकरणात काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ प्रसारित करीत होते. याप्रकरणी कोणीही चुकीची पोस्ट, अफवा पसरवू नयेत, जातीय तेढ निर्माण करू नये, असे आवाहन जगताप कुटुंबीयांसह पिंपळे सौदागर ग्रामस्थांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT