पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनच्या तिसऱ्या दिवशी रस्त्यांवर वर्दळ कमी, मात्र...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनचा आज तिसरा दिवस. गुरुवार औद्योगिक सुटी. त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या तुनलेत शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. पण, काही ठिकाणी पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू होती. परवाना नसणारे, मास्क न लावलेले, दुचाकीवर दोन जण जाणारे, चारचाकीतून दोनपेक्षा अधिक जण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

पुणे शहर व ग्रामीण भागातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. काही ठिकाणी कसून चौकशी सुरू होती. वाहनचालकांकडील परवाने तपासले जात होते, तर काही ठिकाणी फक्त बॅरिकेड लावलेले होते. आळंदी-पुणे रस्त्यावर चोविसावाडी चऱ्होली व आळंदी-देहू रस्त्यावर डुडुळगाव येथे दिघी पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहेत. पुणे-नाशिक, पुणे-मुंबई व मुंबई- बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) वाहतूक तुरळक होती. शहराच्या अंतर्गत भागातील निगडी-भोसरी स्पाइन रस्ता, निगडी-भोसरी टेल्को रस्ता, भोसरी-वाकड-हिंजवडी रस्ता, काळेवाडी फाटा-देहू आळंदी रस्ता या रस्त्यांवरही फारशी वर्दळ नव्हती. एमआयडीसीतील रस्तेही सुनेसुने होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकुर्डी रेल्वेस्टेशन जवळील चौकात निगडी पोलिसांनी तपासणी नाका उभारला होता. विनापरवाना वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले. तर, परवाना आहे परंतु, दुचाकीवर दोन जण, मोटारीत दोनपेक्षा अधिक प्रवासी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही नियुक्तीस होते. मास्क नसणाऱ्या वाहनचालकांकडून पाचशे रुपये व थुंकताना आढळल्यास दीडशे रुपये दंड वसूल केला जात होता. असेच चित्र वाल्हेकरवाडी, चापेकर चौक चिंचवड, पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, पिंपळे सौदागर, विशालनगर, वाकड, सांगवी फाटा, भोसरी या ठिकाणीही असेच चित्र बघायला मिळाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT