पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना मिळणार घरबसल्या प्रमाणपत्रे; असा करा अर्ज... 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी गर्दी होणार आहे. ही गर्दी लक्षात घेता कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी अप्पर तहसीलदार पिंपरी-चिंचवड कार्यालयाने घरबसल्या ऑनलाइन दाखले देण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी 'आपले सरकार' या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरीयुक्त दाखले मिळणार असल्याचे तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले आहे.

विद्यार्थांनी प्रामुख्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची गरज नाही. नागरिकांनी आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर ई-मेल आयडीवर दाखले मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात प्रथमच अप्पर तहसीलदार पिंपरी-चिंचवड कार्यालयामार्फत वेबसाईट https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1 सुरू करण्यात आली आहे.

'आपले सरकार' https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटवर कशाप्रकारे अर्ज दाखल करावा, यासाठी व्हिडिओ लिंक दिली आहे. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तसेच, महा-ई सेवा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत. नागरिकांना 'आपले सरकार' या पोर्टलवर अर्ज भरण्यास अडचण येत असेल, तर त्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड हद्दीतील महा-ई सेवा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घराजवळील महा-ई सेवा केंद्र अथवा नागरिक सुविधा केंद्रांना संपर्क साधून आवश्‍यक कागदपत्रे जमा करावीत. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर 020-27642233 संपर्क करावा.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Nagpur Truck Accident: 'समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू'; एकजण गंभीर, दुरुस्तीसाठी ट्रक उभा अन् काय घडलं?

Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

Real Estate 2026 : नवीन वर्षात घरांच्या किंमती वाढणार की कमी होणार? कोणत्या घरांसाठी जास्त मागणी असेल? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : ठाण्यात पोखरण रोड परिसरात बिबटे दिसल्याने नागरिकांत भीती

SCROLL FOR NEXT