पिंपरी-चिंचवड

पिंपरी : अतिक्रमण कारवाईमुळेच 'त्याने' आत्महत्या केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने भाजी विक्रीच्या हातगाडीवर कारवाई केली. त्यामुळे भाजीविक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. योगेश वैजनाथ म्हेत्रे (वय 17, रा. घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 

लॉकडाउन कालावधीत भाजीविक्री करण्यासाठी महापालिकेचे पास घेणे बंधनकारक केले आहे. या बाबत योगेशला माहिती नव्हती. त्यामुळे तो पास विनाच भाजीविक्री करीत असल्याने अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्याच्यावर दोन वेळा कारवाई केली. पहिल्या कारवाईत हातगाडी नेली, तर दुसऱ्यांदा केलेल्या कारवाईत वजनकाटा घेऊन गेले. 
या नैराश्यातून योगेशने सोमवारी (ता. 11) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या बाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे म्हणाले, ''पासविना भाजीविक्री करणाऱ्या अनेकांवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे. या कारवाईवेळी महापलिकेचे अधिकारी, पोलिसही हजर असतात. नियमाप्रमाणेच कारवाई केलेली आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

SCROLL FOR NEXT