Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana Sakal
पिंपरी-चिंचवड

‘सुकन्या समृद्धी ठेव’ ठरतेय लाभदायी

प्रशांत पाटील

पिंपरी - मुलींचे शिक्षण (Girl Education) किंवा विवाहासाठी (Marriage) पालकांना (Parents) वेळेवर पैसा (Money) उपलब्ध व्हावा, यासाठी टपाल खात्याने (Post Department) सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी ठेव’ योजनेला (Sukanya Samruddhi Thev Scheme) चांगला प्रतिसाद (Response) लाभत आहे. शहरातील टपाल कार्यालयातून योजनेचे शेकडो अर्ज नागरिकांनी नेले आहेत. या कार्यालयात वर्षभरात योजनेची दीड हजार खाती उघडण्यात आली आहेत. परिणामी या योजनेतून टपाल खात्याची ‘समृद्धी’ होत आहे. (Sukanya Samruddhi Thev Scheme Big Response Post Department)

बहुतांश लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी टपाल खात्यात गुंतवणूक करतात. यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. टपाल खात्याने खास मुलींसाठी ही योजना सहा वर्षांपूर्वी सुरू केली. या खात्यावर दरमहा किमान २५० रुपये रक्कम जमा करू शकता. या योजनेत जर तुम्ही १५ वर्षांसाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला २१ वर्षानंतर ६६ लाख रुपये मिळतील. जमा रकमेवर प्रचलित व्याज दरानुसार व्याज देण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकांकडून दर महिन्याला १०० ते १५० खाती उघडण्यात येत आहेत.

पैसे कधी मिळणार?

एखादी मुलगी २४ ते ३० वर्षांची होईपर्यंत ही योजना मॅच्युअर होते. त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याजही मिळत राहते. या योजना खात्यातून १८ वर्षांनंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. तर मॅच्युरिटीवर व्याजासह पूर्ण रक्कम मिळते. मुलीच्या लग्नावेळी हे पैसे खूप कामात येतात. त्यामुळे पालकांवर बोजा येत नसल्याने पालकांची पसंती मिळत आहे.

‘मुलींच्या भवितव्यासाठी सुंदर योजना असल्याने पालकांची चौकशीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी होत आहे. मुलीचे वय २१ वर्ष झाल्यानंतर हे खाते बंद करता येते. तोपर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम व्याजासह मुलीच्या पालकाला देण्यात येते. याच जमा रकमेतून मुलीच्या लग्नासाठी खर्च करता येऊ शकते.’

- के. एल. पारखी, जनसंपर्क, टपाल कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Marathi News Live Update: बेकायदा होर्डिंगविरोधात २४० तक्रारी, पण कारवाई नाही; उदय सामंत यांचा आरोप

SCROLL FOR NEXT