पिंपरी-चिंचवड

Coronavirus : पिंपरी-चिंचवडसाठी रविवार ठरला दुहेरी दिलासादायक 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी Coronavirus : पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा रविवार दिलासादायक ठरला. दिवसभरात केवळ पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. तर, दहा जण बरे होऊन घरी परतले. शिवाय, उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही जास्त असल्याने महापालिकेच्या वॉर रुममधील चित्र आशादायक होते. आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण इंदिरानगर, भाटनगर, रुपीनगर, बौद्धनगर व दत्तनगर येथील आहेत. तसेच, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगरचे सहा, तर दिघी, खडकी, ताडीवाला रोड व आंबेगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात 11 मार्च रोजी आढळला होता. तेव्हापासून आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 522 झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत म्हणजे 16 मेपासून शहरात तब्बल 306 रुग्ण आढळले. म्हणजेच सरासरी दिवसाला वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. आज हा आकडा पाचवर खाली आला. सध्या 252 जण महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार घेत असून 262 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत सर्वाधिक रुग्ण आनंदनगर चिंचवड स्टेशन, रुपीनगर- निगडी, भोसरी- गावठाण परिसरात आढळले आहेत. त्यामुळे हे तीनही ठिकाणे हॉटस्पॉट ठरली आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून येथील रुग्णही बरे होऊन घरी परतू लागली आहेत. बरे झालेल्या सर्वांना चौदा दिवस घरातच थांबण्याच्या अर्थात होम क्‍वारंटाइनची सूचना प्रशासनाने केलेली आहे. 

आजपर्यंत 291 पुरुष आणि 231 महिलांना संसर्ग झालेला आहे. शिवाय, संसर्ग झालेल्यांमध्ये 22 ते 39 वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक 212 आहे. त्या खालोखाल 40 ते 59 वयोगटातील प्रौढांची संख्या 119 आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, असे सांगितल्या जाणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 12 वर्षांखालील मुलांची संख्या अनुक्रमे 57 आणि 56 आहे. 13 ते 21 वयोगटातील युवकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे शहर, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 40 रुग्ण सध्या पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजपर्यंत 34 जण उपचार घेऊन बरे झाल्याने घरी गेले आहेत. मात्र, 12 जणांचा बळी गेलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT