Usha-Dhore sakal
पिंपरी-चिंचवड

शिक्षणाचा स्तर सामाजिक, कौटुंबिक आदर वाढवितो - महापौर ढोरे

कासारवाडीत महापौर यांचे प्रतिपादन; शाळेचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनिवार्य असून, शिक्षणाचा स्तर, सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढवितो.’’ असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले. महापालिकेच्या कासारवाडी (प्रभाग क्रमांक २०) येथील श्री छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका सुजाता पालांडे, स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, सहायक आरोग्याधिकारी रमेश भोसले, उपअभियंता धनंजय गवळी, संतोष दुर्गे, महेश देवरे, मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

अशी आहे शाळा

कासारवाडी शाळेच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर वाहनतळ आणि पाच मजले तयार करण्यात आले आहेत. शाळेत प्रत्येक मजल्यावर सात ते आठ वर्गखोल्या, स्टाफरुम, कार्यालय असून, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, संगणक कक्ष आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. शाळेसाठी आठ व्यक्ती क्षमतेची लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी १५५० चौरस मीटरचे खेळाचे मैदान बनविण्यात आले आहे. या शाळेचे क्षेत्रफळ ४५६७ चौरस मीटर असून शाळेच्या बांधकामासाठी सुमारे १३ कोटी ७१ लाख इतका खर्च आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT