दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन saka
पिंपरी-चिंचवड

बोर्डाची ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा; निगडीत दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुपारी बारा वाजता आंदोलनास सुरूवात केली.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘दहावी परीक्षा रद्द करा, ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा, ’’ अशा घोषणा देत शहरातील शेकडो विद्यार्थी आज (ता.३१) रस्त्यावर उतरले. शेकडो मुलांनी निगडी ते आकुर्डी बजाज कंपनी दरम्यान घोषणा फेरी काढली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा परीक्षाच रद्द करा, अशी मागणी करण्यात आली.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुपारी बारा वाजता आंदोलनास सुरूवात केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालय हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या वर्षीही ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. इयत्ता १२ वीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. हे सांगतानाच या दोन्ही वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितल होते. शिक्षणमंत्र्यांच्या याच निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आज (ता.३१) रस्त्यावर उतरले आहेत.

‘‘आमचे सगळे वर्ग ऑनलाइन झाले आहे. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही आणि झाला तेवढा समजला नाही. त्यामुळे आम्ही परीक्षेला कसे सामोरे जायचे,’’ असा प्रश्‍न उपस्थित करत बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यात आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय, डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालय, घरकुल परिसरासह शहरातील विविध भागातील शाळा -कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षा रद्द करा, अशा घोषणा देत निगडी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. शेकडो मुलांनी निगडी ते बजाज कंपनी दरम्यान घोषणा फेरी काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT