पिंपरी-चिंचवड

प्राधिकरणात रविवारी उलगडणार वाइल्ड लाइफ दुनियेतील भावविश्व

CD

पिंपरी, ता. ६ ः वाघ, सिंह, हत्तीपासून जगभरातील विविध वाइल्ड लाइफ सेंचुरी व जंगलातील थरारक प्रसंग, प्राणी-पक्षी यांच्या विविध हालचाली प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी टिपलेल्या आहेत. त्यांचा अप्रतिम फोटोग्राफीचा स्लाइड शो व त्यांची प्रकट मुलाखत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (ता.९) सकाळी साडेनऊ वाजता आकुर्डी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे. देवदत्त फोटोग्राफी स्कूलतर्फे आयोजित कार्यक्रमास महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप बंड, इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलचे संचालक डॉ. संजय सिंग आदी उपस्थित राहतील. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी बद्दल अनेक समज, गैरसमज, त्यातील आव्हाने, कोणते कॅमेरे वापरावेत, कोणत्या लेन्स वापराव्यात, कोणत्या वेळी कुठे व कशी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तर या कार्यक्रमातून मिळणार आहेत. बैजू पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोणारमध्ये शुक्रवारपासून 'खगोल दर्शन महोत्सवा'चे आयोजन; 'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

Pune Crime News: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठांचे दागिने लंपास

Parola News : भंगार खरेदीतून अनेक युवकांना रोजगार; पारोळा शहरात खरेदी व्यवहारातून हजारो रुपयांची उलाढाल

Degloor Drug License: देगलूरमध्ये औषध विक्रीत गंभीर अनियमितता; डी. अँड जी फार्माचे दोन्ही परवाने रद्द, २१ एप्रिलपासून खरेदी-विक्रीस संपूर्ण बंदी

Pune PMP Bus Theft: पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने लंपास; दोन लाखांचा ऐवज चोरीस

SCROLL FOR NEXT