पिंपरी-चिंचवड

चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी 'ते' ठरले देवदूत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी लोणावळा येथे थेरगाव सोशल फाउंडेशनचे युवक सरसावले आहेत. ते संकटात सापडलेल्या ग्रामस्थांसाठी देवदूतच ठरले आहेत. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राजमाची, वन्हाटी, फणसराई व उढेवाडीमध्ये जवळपास 41 कुटुंबांना मदतीचा 'होम टू होम' हात या युवकांनी दिला आहे.

थेरगाव येथील सोशल फाउंडेशनच्या युवकांनी रविवारी (ता. 7) थेट संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी लोणावळा गाठले. यामध्ये त्यांना अन्नधान्य व घरगुती सामान दिले आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट व बिस्कीट देण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता हे युवक लोणावळ्यात पोचले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिखल व अद्यापही पडलेली घरे सावरण्यातच नागरिक व्यस्त असल्याचे पाहून सोशल फाउंडेशनच्या युवकांचे डोळे पाणावले. तसेच लांब पल्ल्याहून अद्यापपर्यंत कोणाचीही मदत मिळाली नाही. मात्र, सर्व युवक देवदूतासारखे धावून आल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. युवकांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच संकटावर मात करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT