पिंपरी-चिंचवड

खिडकीचे गज कापून शिरायचे घरात, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी  : बंद घरांच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १२ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार (वय ३०, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  घरफोडी करणाऱ्या आरोपीबाबत पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार  पथकाने औरंगाबाद येथे जाऊन वाळूज परिसरातून वाळूज पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. तेथे चार दिवस वेशांतर करून आरोपी पवार याच्यावर वॉच ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांसह केल्याचे कबूल केले. आरोपी पवार याच्याकडून पिंपरी आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी, देहूरोड, भोसरी, चाकण व आळंदी पोलिस ठाण्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

हेही वाचा :

दरम्यान, आरोपी पवार याने घरफोडी करून चोरी केलेले दागिने तो एका व्यापाऱ्याकडे विक्री करीत होता. गुन्ह्यातील मुद्देमाल त्याने एका व्यापाऱ्याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संदीप अंकुश केत (रा. सम्राट चौक, अक्कलकोट, जि. सोलापूर), या व्यापाऱ्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

SCROLL FOR NEXT