पिंपरी-चिंचवड

पिंपरीला वादळाचा तडाखा, पण कोरोनाने दिला दिलासा; आज काय घडलं पाहा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार घेऊन बरे झालेले 35 रुग्ण आज दिवसभरात आपापल्या घरी गेले. हे सर्व जण शहरातील वाकड, चिंचवड, रहाटणी, फुगेवाडी, ताथवडे, पिंपळे सौदागर, रावेत, वाल्हेकरवाडी, आनंदनगर व बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना पुढील चौदा दिवस घरातच राहण्याची सूचना वायसीएम प्रशासनाने केली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 25 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात 15 पुरूष व दहा महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 589 झाली आहे. त्यापैकी 348 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 231 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे आनंदनगर चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, रामनगर चिंचवड, दापोडी, पिंपरी, किवळे, पिंपळे गुरव, अजंठानगर, मोरवाडी, कसबा पेठ पुणे, आंबेगांव, बालेवाडी, खडकी व औंध येथील रहिवासी आहेत. तसेच, आज मृत झालेला रुग्ण सत्तर वर्षीय आहे. ते देहूरोड येथील रहिवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेचे आवाहन

पावसाळा सुरू झालेला असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये. पावसामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सोबत किमान एक अतिरिक्त मास्क ठेवावा, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.



   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT