Thirty people including former corporator Amar Mulchandani have been charged with fraud 
पिंपरी-चिंचवड

माजी नगरसेवक अमर मूलचंदानी यांच्यासह तीस जणांवर फसवणुकीचा गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : बनावट कागदपत्रे तयार करीत बनावट महिलेद्वारे बनावट दस्त नोंदणी केली. यासह बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन व माजी नगरसेवक अमर मूलचंदानी यांच्यासह तीस जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अनिता किशोर चव्हाण (वय ६०, रा. एन आय बी एम रोड, महमंदवाडी, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, अशोक मूलचंदानी, दया मूलचंदानी, दीपा मंगतानी, राजेश सावंत, चंद्रशेखर अहिरराव, नरेंद्र ब्रह्मणकर, प्रकाश नंदभारती, धीरज भोजवानी, व इतर सर्व पदाधिकारी व अधिकारी, मुख्य सीईओ ब्रँच मॅनेजर, कर्ज अधिकारी विनय आऱ्हाना, दत्तात्रय डोके, अश्विन कामत, मयूर श्राफ, किशोर केसवानी, भल्ला उर्फ महादेव साबळे, गणेश वर्मा, निखिल शर्मा, कालिदास सुतार, हितेश ढगे, कोमल लुल्ला, डॉली सेवानी, राजू तनवानी, चंदनसिंग, ऍडलॅब एंटरटेनमेंट लि. सर्व संचालक व भागीदार, भूमिक इंटरप्रयजेसचे भागीदार व संचालक, या कर्ज प्रकरणातील जामीनदार प्रशांत अरुण पाटील, जुन रेयान फर्नांडिस व इतर यांच्यावर  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साध्या वेषात जॅकी श्रॉफ पोहोचला मावळात; घरकाम करणाऱ्या तरुणीचं केलं सांत्वन

आरोपींनी फिर्यादी अनिता यांचे  बनावट पॅनकार्ड व इतर कागदपत्रे तयार करून सहदुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला सादर करीत दस्त नोंदणी केली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या पतीला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांना ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देत बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व इतर व्यक्तींशी संगनमत करून एक कोटी २५ लाख रुपये मंजूर करून आपापसांत खात्यावर वर्ग केले. त्यानंतर २५ लाख रुपयांची रक्कम काढून चेअरमन व इतरांनी वाटून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान, दि सेवा विकास बँकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा दाखल असलेल्या गुन्हयात मूलचंदानी यांना चार दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्यामध्ये त्यांना पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. अशातच आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Eating Bread Daily: दररोज ब्रेड खाल्लं तर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT