पिंपरी-चिंचवड

कोरोनामुळे वाकड चर्चेत; आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या बघाच...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरातील पश्चिमेकडील महत्त्वाचे उपनगर म्हणजे वाकड. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड आणि आयटी सिटी हिंजवडीला जोडणारा दुवा. पण, आज हा दुवा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तो म्हणजे सध्या सर्वांच्या तोंडी असलेल्या एका शब्दाने. तो शब्द म्हणजे कोरोना. होय, कोरोना. एकट्या वाकड परिसरात आजपर्यंत ३२ जणांना कोरोना संसर्ग झालेला आहे. 

वाकड मधील कावेरीनगर परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. आता ही संख्या ३२ झाली आहे. यातील सतरा जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पंधरा जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार घेऊन बरे झालेले 37 रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी गेले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा कहर सुरूच आहे. अकरा मार्च रोजी शहरातील पहिला रुग्ण आढळला होता. सध्या रुग्ण संख्या सहाशे ७८ पर्यंत पोचली आहे.  गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे असून आयुक्तांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मास्क नसल्यास 200 रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका 500 रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समिती सभेने दंडाची रक्कम 500 ऐवजी 200 रुपये आकारावी, असा ठराव मंजूर केला. त्यामुळे आता मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

PMC power saving deal flop: वीज बचतीचा 'महा-फ्लॉप' करार - महाप्रितला भार सोसेना

Gadhinglaj MIDC Industrial Growth Analysis : कोल्हापूर, कागल एमआयडीसी 'फुल्ल'! गडहिंग्लजमध्ये सात हेक्टर जागा शिल्लक; नव्या उद्योगांसाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT