Maya Barne sakal
पिंपरी-चिंचवड

Pawana Thadi : यंदा पवना थडी जत्रा ताथवडेतील पशु संवर्धन जागेत करावी - माया बारणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

वाकड - थेरगाव, ताथवडे, वाकड या गावांसह लगतच्या दहा-बारा गावांतील महिलांना व त्यांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ताथवडे येथील शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या जागेवर पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे, अशी मागणी माजी नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

याबाबत माया बारणे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते, मागील सर्व पवनाथडी जत्रा ह्या सांगवी येथील पीडब्ल्यूडी व पिंपरी येथील एचए मैदान या ठिकाणी म्हणजे शहराच्या एकाच भागात झाल्या आहेत.

त्यामुळे थेरगाव, वाकड, पुनावळे, ताथवडे, चिंचवडगांव, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, रावेत, किवळे, मामुर्डी या परिसरातील महिलांना व बचत गटांना अद्याप संधी व वाव मिळाला नाही.

या भागात देखील मोठ्या प्रमाणात महिलांचे बचतगट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी, तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक मोठी संधी प्राप्त होईल. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या पवनाथडी जत्रेचे आयोजन ताथवडे येथील शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या जागेत करावे.

या भागालागत आयटी पार्क देखील असल्याने जत्रेस उस्फूर्त प्रतिसाद लाभेल त्यामुळे पशुसंवर्धन खात्याच्या जागेत पवनाथडीचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना सुचना द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT