पिंपरी-चिंचवड

Video : पिंपरी-चिंचवडमधील हे चार पूल आहेत धोकादायक!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील तीन उड्‌डाणपूलांवर वाढणाऱ्या वड आणि पिंपळांच्या झाडांमुळे त्यांचा धोका वाढला आहे. या पुलांच्या यादीमध्ये निगडी परिसरातील मधुकर पवळे उड्‌डाणपूल, भोसरी परिसरातील राजमाता जिजाऊ उड्‌डाणपूल, चिंचवड स्टेशन उड्डाणपूल व आकुर्डीतील दळवीनगर भागातील पुलाचा समावेश आहे. याखेरीज जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटरमध्ये देखील ही समस्या निर्माण झाली आहे. 

निगडी भागातील टिळक चौक, भोसरी परिसर आणि चिंचवडमधील चापेकर चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण व्हायची. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी उड्‌डाणपूल उभारले. मात्र, सध्या या तिन्ही पुलावर वड आणि पिंपळाची झाडे वाढली आहेत. या झाडांची मुळे पसरू लागल्यामुळे या पुलाला तडे जाऊन धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस पूलावर देखील पूर्वी ही समस्या होती. मात्र, मध्यंतरी हाती घेतलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान वारंवार वड आणि पिंपळाची झाडे येणाऱ्या जागांवर केमिकल प्रक्रिया करुन हा प्रश्‍न सोडवण्यात आला आहे. शहरातील या तिन्ही पुलांच्या बरोबरच ग्रेडसेपरेटरमध्येदेखील अशा प्रकारची प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील किवळे पुलावर देखील ही झाडे आल्यामुळे तिथला धोकादेखील वाढला आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे तातडीने त्यांनी डागडुजी करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका म्हणते लॉकडाउनचा फटका...

पुलावर वाढणारी झाडे काढण्याचे काम हे दरवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये करण्यात येते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे शहरातील देखभाल दुरुस्तीचे कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. आता पावसाला सुरुवात झाली असताना देखील शहरात अनेक ठिकाणी राहिलेली रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. सध्या पावसाने उघडीप घेतलेली आहे. त्यामुळे शहरात ज्या उड्‌डाणपुलांवर अशा प्रकारची झाडे वाढली आहेत. ती काढून टाकण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बीआरटी विभागाचे प्रवक्‍ते विजय भोजने यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT