पिंपरी-चिंचवड

मावळ : तळेगावात आणखी एवढ्या जणांना कोरोनाची बाधा!

सकाळ डिजिटल टीम

तळेगाव स्टेशन : शनिवारी (ता. २०) कोरोनाचे निदान झालेल्या तळेगाव परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी तळेगावातील महिलेचा मुलगा व नात तसेच, वराळे येथील तरुणाची पत्नी अशा तिघांचे कोविड -१९ चाचणी अहवाल रविवारी (ता. २१) पॉझिटिव्ह आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
                    
तळेगाव दाभाडे येथील शनिवारी (ता. २०) आढळलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या जवळच्या संपर्कातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी सदर महिलेचा ३३ वर्षीय मुलगा आणि साडेचार वर्षांच्या नातीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील औंध ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वराळे येथील कोरोनाबाधित पुरुषाच्या जवळच्या संपर्कातील त्याची पत्नी आणि भाऊ यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी ३५ वर्षीय पत्नीचा कोविड-१९ तपासणी अहवाल रविवारी (ता. २१) पॉझिटिव्ह आला आहे. तर भावाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. या सर्वांवर सुगीपश्चात संशोधन केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार चालू असल्याची माहिती तळेगाव प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. संबंधित रुग्णांच्या रहिवासाचा परिसर शनिवारी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आल्याचे तळेगावचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा         

गेल्या दोन दिवसांत तळेगाव परिसरात एकूण पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. पैकी बरे झालेल्या दोघांना घरी सोडण्यात आले आहे. आजपावेतो मावळात सापडलेल्या एकूण ५३ रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण एकट्या तळेगावात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT